उन्हाळ्यातल्या एका तापलेल्या दिवशी दोघं भेटले. अगदी गर्द उन्हाने दोघेही रापले होते ...जिकड़ं पहावं तिकडं उन्हाचीच गर्दी आणी एकटे हे दोघं highway आणी पायवाट ! भेटले म्हणजे नेहमी शेजरुनच जायचे. कधी कधी cross पण करायचे एकमेकांना पण बोलणं नाही झालं कधी. highway आपला नेहमी पायाला भिंगरी लावल्यासारखा पळत रहायचा नाकासमोर. पायवाट कोणी तरी येइल म्हनून वाट पाहत सुस्त लोळत पडलेली असायची. तर खुपच ऊन होतं त्या दिवशी. highway पण शांत होता काही रहदारी नव्हती, कोणाला कुठं सोडायचे नव्हते त्याला. so तो पण जरा विसावला होता, त्याच्या घामाच्या धारा मृगजळ म्हणुन खपून जात होत्या. Out of extream boredom ते दोघं बोलायला लागले.
Highway: "कसलं ऊन आहे सालं.पार वितळायला आलोय. मऊ-मऊ झालोय काही ठिकाणी, डाम्बर वितळलयं कुठं कुठं. आणी हे गाडीवाले जातात fast अजुन, घासून-घासून अजुन heat वाढते. फाडतोचं tyre त्यांचे नाहीतर गप्प बसतील म्हणजे"
पायवाट : "अरे काय हे बोलनं. tyre कसलं फ़ाडतोयं त्यांचं. बिचारे त्यांना पण ऊन नकोय म्हणूनच fast जाताहेत ना ? लवकर घरी जायचय म्हणुन. तू पण Hot-Head झालायं आता उन्हात हिंडून हिंडून. acidity झालिये का तुला ? :D "
Highway: "hmmm... तुझं बरयं बाई. निवांत झोपयाला मिळतं तुला. मला दिवस-रात्र हीच भुर्र-भुर्र. कुठल्या कुठं जावं लागतं रोजंच. तुझं बरयं ग. शांत पडून असतेस, निवांत आहे सगळं ! जास्ती fast जायची घाई नाही, speed limit नाही आणी speed limit तोडायची खुमखुमी नाही. मनात आलं की वळा. कुठं काही नविन रानफुला चं रोपटं उगवलं की वळा लगेच त्याच्या बाजूने चिकटून. मस्त, नाजुक turn घेउन हलकासा touch करुन जा त्याला. थोड़ा दगड आला मधे की मारा प्रदक्षिणा त्याला. आमचं नाही बाबा तसं. वळायचा board दिसला कीच वळा. Board म्हणाला left turn की कसरत करत T shape मधे वळा लेफ्टला. इतकं जाड शरीर आता वळत पण नाही पटकन. तुझी figure भारिये राव! कशी सळसळत्या नागिनी सारखी वळतेस, नजाकतीत ! आमचं वळणं म्हणजे अगदी कष्टाने गुडघे धरत वळा ,संधिवाताच्या पेशंट सारखं! मधे डोंगर आला तरी direct घुसा त्याच्यात -बोगदा म्हणे-चायला चिडतो तो सारखं काय म्हणे घुसतोस. mind ur business म्हणे. मीच कसाबसा सावरून-आवरून बसलोय, गोळा करुन स्वताला आणी तू घुस आतून.आधीच भुसभुशीत झालाय तो दरडी टाकतो चिडला की. गप्प गुमान एकून घ्या आणी चलते रहो !"
पायवाट: "मला तर हिंडू देतो तो डोंगर मला ! उलट मीच उनाडक्या करत असते एकटीच त्याच्यावर. पण काय अरे, कधीतरी कोणीतरी भेट्तं मला, आळसटल्यासारखी पडून असते इतरवेळी. मग कोणीतरी हळूच चालत येतं, हळुहळु boring पावलं टाकत जातं. ना कोणाला घाई, ना tyre च्या रेषा घासून जातात. मला पण वाटतं मस्त घुसावं डोंगरात, जे येइल मधे त्याला तुडवत. कशाला adjustment, कशाला आपणच वळावं नेहमी. direct सरळ , fasht !"
Highway: "वेडी आहेस मग तू .किती दिवस झाले नंगे-पाय कोणी फिरलच नाहीये माझ्यावर. ते नेहमीचे fast tyres, काळे-कुळकुळीत, चट्टे-पट्टे वाले, boring, एका रेषेत जातात सगळे. touch पण त्यांचा जळका वास सोडून जातो. अशी नाजुक पावलं चालावित माझ्यावर, माझ्याशी खेळत, बोलत. त्यांचे ठसे उमटावेत माझ्यावर. मग मी जपून ठेवावे त्यांना, आठवण. माझ्याशी बोलत राहावं पावलांनी. मधुनच खाली वाकून गवताचं फूल तोडावं. कधी ते भेगाळलेले पाय पण भेटावेत. मातीत बर वाटतं त्यांना पण. नाहीतर सारखं दगडांच्या ठेचा खाल्लेले ते तळवे. हळूच मालिश करावी त्यांची. वेडी आहेस तू ,नुसतं जोरात पळुन पळुन थकलोय मी. कशाच्या मागे पळतोय तेच माहित नाहीये. जिकड़ं तिकडं नुस्ता रस्ता, stop असा नाहीच. पळणं ठीक आहे ग , पण stop तरी माहिती असेल तर बरं वाटतं. आणी आता वेगाची नशा पण राहिली नाहीये ...."
पायवाट :"मला वाटते बाबा वेगात जावं. तू कसा अगदी नदी आली तरी लगेच तिच्या वरून उडी मारून जातोस. एका मिनिटात पार ! नदी ,तलाव जसं किस झाड़ की पत्ती. मला मात्र त्या सगल्या तलावाला प्रदक्षिणा मारून १७६० turns घेउन जावं लागतं. थकतात पाय माझे zig-zag-zig-zag नुस्ता round n round..आणी नदी आली की बास कुठं तरी घाटावर जाउन बसून रहा. stop! धड होडित पण चढ़ता येत नाही आणी परत पण फिरता येत नाही, थाम्बा तिथच, तो boring प्रवाह बघत !असं वाटतं direct पळत पळत यावं आणी मोट्ठी उडी मारावी नदीच्या पण वरून. मस्त bridge व्हावं आणी नदीला टुक-टुक करावं...कसली मज्जा ना ?"
Highway :"हा हा हा !अरे भीती वाटते बाबा नदीवरून जाताना..आवाज change झालेला कळत नाही का तुला ?bridge वरून जाताना थरकाप होतो माझा अजुन :D"
तेव्हढ्यात 1 गळका-tanker जातो highway वरून, पानी सांडत....
Highway : "अहाहा!! मस्त वाटतय आता. हा गळका tanker आवडतो बाबा मला. मस्त भिजवून जातो. थोडावेळ full थंडगार - chillax! पण चायला पानी पिता येत नाही त्याचे.सगळं वाहून जातं अंगावरून त्या गटारात. तुझं बरयं मस्त भिजा, असं पानी पिउन पिउन तृप्त व्ह्या , आणी परत मस्त वास तुझा. अजुनच मऊ-मऊ होतेस तू भिजल्यावर. चिकट-चिकट चिटकुन राहतेस पायाला, पकडून ठेवतेस pant ला. इकडं भिजलो काय किंवा नाही काय - काही फरक नाही पडत. फ़क्त थोड़ा जास्ती काळा वाटतो पाउस झाल्यावर.. "
पायवाट: "अरे कसला सेंटीबाबु (sentibabu) आहेस रे! श्रीमंत बापाचं senti पोरं :) वाटतोस रांगडा पण कसले boring ह्ळवे बोलतोस. चल जरा वेळ आहे तर rest घे थोडी. एकेकाचं नशीब असतं बाबा. जे नाही मिळत त्याचच जास्ती अप्रूप वाटतं........
Epilogue 1 :
पायवाट: "थांब कोणीतरी येतय नंगेपाय इकडं. बघते कसा असतो स्पर्श तळव्यांचा, याच्या आधी कधी लक्षातच नाही आलं इतकं..."
Highway: "हा हा हा ..मी पण परत वेगाची धुंदी घेतो जरा, वारा पिउन बघतो परत. tyres काही इतके पण वाईट नसतात. आजकाल मस्त नक्षी पण असते त्यांच्या वर :) चला C ya....भेटू असेच परत कधी तरी निवांत"
Epilogue 2 :
आणी मग दोघं परत आपापल्या वाटेला लागले. काही वर्षांनी मग गावागावात डाम्बरी-road झाले. highway वाढले खुप. मग पायवाटेचं पण स्वप्न पूर्ण झालं highway सारखं जगायचं, एका वळणा्वर ती पण highway झाली. आणी जुने highway शेवटचे क्षण मोजत पायवाट होण्याची वाट पाहत बसले होते.
Epilogue 3:
मग दिवसेंदिवस गावाकडचि भरपूर लोकं शहरात यायला लागली. वेगाच्या, पैशाच्या मागे आपला शांत life सोडून. आणी शहरी लोकांनी गावात घरं बांधायला काढली. पायवाटा शहराकड़ं जायला लागल्या आणी Highway गावात जागा शोधत राहिले.
Thursday, April 23, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
Nice. I liked this the most.
Post a Comment