खुप लहान असताना एकदम करकरीत , नव्या कोऱ्या, serially arranged नोटांचा गठ्ठा बघितला होता. एकदम new,एकदम virgin नोटा. त्यांचा कडकपणा जाणवत होता. single नोट फडकवली तर कड-कड आवाज येइपरयन्त ताठ नोटा. आणी शिवाय serial मधे 1-100 directt ..even सगळ्यांचा वास पण सारखा, अगदी factory तुन निघालेल्या, एकदम गरम-गरम, तव्यावरून ताटात :) खुप अप्रूप होता त्या नव्या करकरीत नोटांचं. आणी इतक्या नोटा एकावेळी हातात खुप भारी वाटायचं.....
आता सगळ्याच नोटा तश्या, कोऱ्या करकरीत . ATM मधे गेलं की हाताला चटके बसतात नोटा काढताना. सगळे same छापाचे emotionless चेहरे त्यांचे. जणू काही, काही फरक पडत नाही आम्हाला, ATM मधे असलो काय किंवा पाकिटात असलो काय. ना कधी कोणाचा touch झालेला ,ना वास कसला दुसर्याचा, untouched, virgin, अलिप्त. ना कोणाला petrol चा वास, ना कोणावर किती तरी "व्यवहार" पाहिलेत असा experienced भाव, ना कोणी insecure हातात एक-एक नोट वाचावताना चूरगाळलेला, ना कोणी घड़ी घालून गप्प बसलय आजीच्या कनवटीला, ना कोणाच्या चेहर्यावर आपण किती दिवसात खर्चं नाही झालो असा विरक्त भाव, ना कोणी फाटलेला , सोसलेला, ना वयानुसार येणार्या wrinkles कोणावर, एकमेव silver तारेवर तग धरून राहिलेल्या मऊशार नोटा- आज्जीच्या मऊ हातासारख्या वृद्ध, मायाळु ......नाहीच आता कोणी तसं, आता सगळ्या सारख्याच. माजुरड्या, egoist, ताठ, just हिशेबी ,व्यवहारी, आपल्या पाठीवरचा आकडा दिमाखाने मिरवत बसलेल्या.............पण नोटेची किम्मत तिच्या वरच्या आकड्यावरुन नाही मिळत तर वापरानार्याच्या गरजे वरून मिळते. 1000 ची नोट माझ्यासाठी just-like-that खर्चं होते पण एक मजुराला १० ची नोट दिवसाला खुप होते.
आपण पण सगळे असेच झालोत ना ?? sofasticated, इस्त्री केलेले, व्यवहारी, ताठ...आपल्याच ATM मधे राहणारे, आपल्याच विश्वात. ना कोणावर सोसलेल्याच्या खुणा, ना कोणी struggle करत ख़राब झालेला, ना काही व्रण , ना काही जखमा जगताना. सगळं सरळ-सोट, व्यवस्थित, serially arranged... ना कोणावर wrinkles पडलेत (not because of just age) with experiance. ना कोणी असं खुप वापरून वापरून थकलय, ना कोणी मोडलेलं, ना कोणी मोडून पण तग धरलेलं. ना कोणाला कोणाचा वास. सगळेच अलिप्त एकमेकांपासून. .. जवळ असून पण कोणाच्या सुख-दुखांचा वास कोणाला लागत नाही. एकाच गठ्ठ्यात पण एकदम detached. सगळेच same, सगळे व्यवस्थित , सगळेच serially, एकमेकांपासून only number ने वेगळे करता येणारे. same छाप, same print. सगळेच कड़क, ताठ , egoist,हिशेबी...
कधी तरी घाण व्हा. कधीतरी लढा कधीतरी पड़ा. कधीतरी सुरकुत्या येऊ देत. कधी तरी मऊ व्हा. कधीतरी दूसरा वास अंगाला लागु दया. कधीतरी वेगळी चाव स्वताची इतरांपेक्शा वेगळी....सोडा आपलं ATM चं जग आणी जरा हाता-हातांमधुन, पाकिटा-पाकिटा मधून फिरा. कधी आजीच्या कनवटिला तर कधी कोणाच्या piggybank मधे जाउन बघा, भाजी वालीच्या पोत्याखाली जाउन चिल्लर बरोबर गप्पा मारून बघा. शेवटची एकमेव नोट हातात गच्च पकडनारया बिचाराच्या हातात जाउन घामाने भिजुन बघा. फिरा, फिरा, फिरा कधीतरी ...... एकदातरी ......
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment