Pages

Sunday, January 24, 2010

निसटलेले क्षण !

Reality :
5 Radio stations tuned आहेत कार मध्ये माझ्या. so पटापटा stations change करत जायचं जोवर आवडीचे गाणे लागत नाही तोवर.
Somehow she was in my car. After a long time. मी, ती, माझी कार आणि music जोडीला. Felt really good.

Station 1. कोणतीतरी बकवास Advertisement .......... लगेच change
Station 2. "घण्टा सिंग... " No way . change
Station 3. "पहला पहला प्यार है ....".... ummm नको आता ..
Station 4. "Clocks " yes. "Coldplay" चालेल... so continue.

but then dropped her home. Felt really bad !
Ooops ! "पहला पहला प्यार है ...." her favorite song. Dumb i was.
तरी ती म्हणत होती त्यावेळी इंग्लिश नको म्हणून. Shit, Shit, Shit !! इतकी पण लोकांच्या emotions पर्वा नाहीये. OMG ! what to do ?
Should i say her sorry ? at least some apology. May be she did not observe it. or frndshp मध्ये हे असा सांगणं प्रशस्त नाही वाटत. काही वेगळा meaning निघाला तर ?
Restless Night.
किती सुंदर क्षण निसटला !
(then the popat was - "पहला पहला प्यार है ...." गाणे नाही तर "मैने प्यार किया" मधले गाणे favorite आहेत तिच्या)

Fantasy :
Both are on the way for a dinner somewhere. early stages of dating. a bit tension in the relationship. so कार मध्ये कोणी बोलत नाहीये.
5 Radio stations tuned आहेत कार मध्ये. तो पटापटा stations change करत एकमेकांशी न-बोलण्याची खोटी कारणं सापडतोय.

Station 1. कोणतीतरी बकवास Advertisement .......... लगेच change
Station 2. "घण्टा सिंग... " No way change
Station 3. " मेरे रंग में ......" .... ummm नको आता ..
Station 4. "Clocks " yes. "Coldplay" चालेल... His favorite. so continue

Reached at the restaurant. Pool-side table.
And surprise ! surprise !! surprise !!!
3 musicians are playing for her. Playing her favorite song. " मेरे रंग में ........" from "मैने प्यार किया"
तो , ती आणि music जोडीला .........

तो विचार करतोय "आता कशी नाही होणार impress. After all, i know her...."
ती विचार करतीये "मगाशी हेच गाणे luckily radio वर लागले होते तर change केलेस, आणि आता ? "बुंद से गयी वो हौदसे नही आती". तो क्षण निसटला. आता या क्षणाचं काय कौतुक ".

आपण काय शिकलो ?
१. As a normal person - लाखो घटना रोज घडत असतात. एका क्षणाची एक घटना. जितके क्षण पकडता येतील तितके पकडायचे. निसटलेले क्षणही काही कमी नाहीत.
२. As a blogger/writer -लिहणं बरं असतं खूप. आपण केलेल्या चुका आपल्या पात्रांकरवी दुरुस्त करता येतात. आपल्या आयुष्यातून निसटलेले क्षण जागून घ्यायचे त्यांच्या करवी. तितकंच मनाचं खोटं समाधान !
३. As a Sagar - त्या रात्रीचा impulse ओसरल्यावर दुसऱ्या दिवशी विचार आला, कशाला दुसर्यांच्या आवडी-निवडी, emotions ची पर्वा करायची ? कोणी करतं का आपली ?

Friday, January 15, 2010

Jokes Apart !

Jack : कुठून आणायचे दरवेळी नवीन जोक्स ? तुला पण काही सुचत नाहीये नवीन.

काय timepass चाललाय तुझा ? फेकून दे तो मोबाईल.

जा. गरम पाणी आण रंग काढायला.

Jill : आधी हा SMS ऐक Jack.

" Eve म्हणते Adam ला : सांग ना, तू खरच माझ्यावरच प्रेम करतोस ना?.

Adam म्हणतो : इथे दुसरं कोणी आहे का ?"

Jack : झाला जोक ? यात काय आहे हसण्यासारखं ? SMS च्या जोक्सला लोकं हसत नाहीत आजकाल.

Jill : Jack , आपलं लग्न पण अश्याच अपरिहार्यते मुळे झालाय का ? दुसरं कोणी बुटके मिळाले नाही म्हणून ? जवळपासच्या जगात ३ फुट उंचीचे केवळ आपण दोघंच होतो म्हणून ? इथे दुसरे कोणी नव्हते म्हणून ?

Jack : तुला माहिती आहे याचं उत्तर !!

Jill : हो माहिती आहे..... माहिती होतं. मान्य पण होतं मला. पण परवा Sweetie चा divorce झाला, त्यावेळी खूप भीती वाटली. Love-Marriage असूनही जर असं होऊ शकतं, आपलं तर ....

Jack : दुसऱ्या बरोबर का आपल्या relation ला compare करतेयस ? आपण दुसऱ्यासारखे आहोत का ?

Jill : तसं नाहीरे. पण मला कळत नाहीये कि आपल्या relation मध्ये प्रेम जास्ती आहे कि adjustment ?

Jack : Eve कधी Evolve च नाही झाली.

तुला काय वाटतं आपली Circus पाहायला जे Couples येतात त्या सर्वांचे एकमेकांवर प्रेम असते ?

खर्र- खुर्र प्रेम ?

सगळ्यांनी कुठे ना कुठे Adjustment केलेलीच असते. एकदा Adjustment करायची आहे असं ठरवलं तर बाहुली बरोबर पण संसार करता येतो.

पण कोणीच "इथे दुसरे कोणी नव्हते म्हणून" हे मान्य नाही करत आणि आपण मान्य केलाय इतकाच काय तो फरक.

Jill : इतक कसं रे कडवट बोलतोस तू. बोलला असतास थोडं खोटं, म्हणाला असतास "प्रेम जास्ती आहे " तर काही बिघडलं असतं का ?

Jack : टाक. पाणी टाक. रंग काढू दे चेहऱ्यावरचा.

दिवसभर तोंडाला रंग लावून, खोटे मुखवटे घालून फिरतो आपण. Adjustment च्या चेहऱ्यावर प्रेमाचा खोटा रंग लावून.

एकमेकांबरोबर असताना तरी आपण खरं बोलायला हवं नाही का ?

आपल्या relation मध्ये प्रेम आणि Adjustment पेक्षा हा खरेपणा खूप जास्ती आहे ....

-------------------

Cast : Jack & Jill - Dwarf couple working in some Circus.

Monday, January 11, 2010

समेवर...

आधी तुला बघायचो मग स्वर कळायचे मला. स्वरांची पहिली ओळख कानाआधी डोळ्यांनीच करून दिली. तुझ्या चेहऱ्यावरचे हाव-भाव वाचूनच तर रागदारी कळाली मला.

आपल्या खटल्याच्या घरात कुठला आलाय एकांत ? त्यामुळे तुझ्याजवळ राहण्याची संधी म्हणून बासष्ठचा सवाई अजून आठवतो मला. हिवाळ्याच्या ४-५ दिवसात तुझ्या बरोबर काढलेले कित्येक तास आणि शिवाय संगीत जोडीला.

आपला पहिला सवाई. गर्दीत बुजलेली तू , तानपुरयाचे पहिले स्वर ऐकताच स्तब्ध झालीस. तानपुरा लागे पर्यंत तुझे काळेभोर, आसुसलेले डोळे स्वरमंच शोधात राहिलेले आणि मग हिराबाईंचा षडज लागला. त्याच क्षणी तू डोळे हलकेच मिटलेस..... कदाचित दुसर्या कोणत्याच sense ने कानाला मिळणारा आनंद biased होऊ नये म्हणून visual sense तू बंद केलास. 'दीर्घ "कश" घेताना डोळे आपोआप का मिटतात ?' या नुकत्याच पडलेल्या कोड्याचे पण मला उत्तर त्यावेळी मिळालेले. अगदी स्वर न स्वर तू साठवत होतीस आणि तुझ्या चेहऱ्यावर तो आनंद ओसंडून वाहत होता. अजूनही षडज लागल्यावर तुझेच डोळे आधी दिसतात नंतर तो कानांना समजतो...

मग प्रत्येक तानेला होणारी तुझी भुवयांची हालचाल, हरकती ऐकताना तुझ्या नाजूक ओठांची थरथर आणि समेवर येताना मानेला दिलेले हलकेसे झटके. कितेक वेळ मग सगळा 'तिलक कामोद' मला तुझ्या चेहऱ्यावर दिसत होता, समजत होता.
संगीतातला ओ कि ठो काळात नव्हता त्या वेळी पण काहीतरी नवीनच अनुभवत होतो मी. ती तुझ्या सौंदर्याची अनुभूती होती कि संगीताची हे अजूनही सांगता येणार नाही. पण त्या वेळेपासून नवीच दिसलीस तू मला, नितांत सुंदर.

तुझ्या सोबतीत आजूबाजूचं संगीत पण नव्यानेच ऐकू यायला लागलं होतं.
आणि मग मला ते वेडच लागलं - तुला ऐकताना बघायचं !

आलापी ऐकताना पापण्यांची होणारी मंद थरथर अगदी डोळ्यांच्या आजूबाजूला सुरकुत्या आल्या तरी तशीच हवीहवीशी वाटायची मला.

तबल्याच्या तालांना आपल्या नाजूक पावलांनी ठेका द्यायचीस. मऊशार पावलं आणि ती पैंजणं . विलंबित त्रितालात लोकांना तबला ऐकू यायचा आणि मला तुझ्या पावलांच्या ठेक्याने वाजणारी पैजणे. नंतर पावलं भेगाळली तरी तबल्याची साथ अजून तशीच होती...आणि मला ऐकू येणारी ती पैंजणांची छुमछुम पण...

अतिशय अवघड ताण घेताना आपसूक तुझाही हात वर जायचा. हिरव्याकंच नऊवारी मधून तो गोरापान हात बाहेर यायचा आणि त्या हातांमधल्या त्या गडद हिरव्या बांगड्या. नेहमी पदराआड लपलेले ते सोंदर्य अशावेळी नकळत बाहेर यायचे. लोकं त्या अचूक तानेच्या/जागेच्या सोंदर्यसाठी "वाह !!!!" म्हणायचे अन माझ्या हि तोंडून "त्या" जागेसाठी "वाह !" निघून जायचे. मीही मग अश्या अवघड तानांची वाट पाहत बसायचो. अजूनहि पाहतोय.

मैफिल संपली कि भानावर यायचीस तू, पदर वगैरे नीट करून सावरायाचीस. मग संपला दिवस कि नदी काठावरून घरी जाताना एरवी अबोल असणारा मोगरा फुलून यायचा. किती सांगू किती नको असं होऊन जायचं तुला. अगदी सगळ्या जागा, सगळे राग, बंदिशी त्या हिवाळ्याच्या थंडीतच समजल्या मला.
'सवाई' 'थंडी' शिवाय रंगत नाही म्हणे पण आपली 'थंडी' 'सवाई' शिवाय रंगायची नाही. भारावलेले दिवस ते.
हळूहळू मग माझ्या भावनांना, वेळा-काळाला, प्रहारांना राग समजत गेले. त्याहून महत्वाचे म्हणजे मला "तू" समजत गेलीस....

मैफिलीच्या सर्वोच्य क्षणी शहारून तू डोळे उघडयाचीस, मला शोधायला. तो क्षण तुला माझ्या बरोबर share करायचा असायचा. तुझे ते पाणीदार डोळे बघून माझ्याही अंगभर शहारा फुललेला. मग कळायचं नाही हा शहारा त्या उत्कुष्ट संगीताचा असायचा कि तुझ्या नजरेचा. असे कित्येक क्षण एकत्र जगलेलो, एकत्र शहारलेलो. संगीतामुळे शहारा आला कि शहारलेली, डोळ्यात थोडेसे पाणी आलेली तू दिसतेस. गेल्या चाळीस वर्षात असे कित्येक क्षण सवाई ने दिले....

आणि आता....
माझा चाळीसावा सवाई ! पण तुझ्याशिवाय पहिलाच !!
पण या वेळी स्वरांची कसोटी आहे. ते सगळे स्वर 'ऐकताना' तू 'दिसायला' हवियेस आता मला....

Tuesday, December 29, 2009

भूल

n now i started feeling something. after around 2 hrs.

असं हळूच सुई टोचल्याच जाणवलं. आणि मग हळूहळू संवेदना न जाणवण्याची संवेदना पसरत गेली. i mean sensation हळूहळू 'जात' आहे असे sensation येत होते. एकेक करत आजूबाजूचे स्नायू बधीर होत गेले. आणि मग तो गालाच्या आसपासचा, वरच्या ओठाचा अर्धा भाग बधीर झाला.
डॉक्टर म्हणाले "चूळ भर". ग्लास तोंडाला लावला तर काहीच जाणवेना. पाण्याची टेस्ट कळली पण तो थंडावा, तो गारवा , तो पाण्याचा नेहमी जाणवणारा स्पर्श कळलाच नाही.
खरं तर पाणी म्हणजे सर्वात बेस्ट liquid ! आणि अगदी perfect गार असेल तर मग दुसरे काहीच नको.
"पुरेपूर कोल्हापूर" मधलं पाणी, घराच्या माठातलं पाणी, आजोळी विहिरीवरून पाणी आणताना ओंजळीतून पिलेलं अगदी पहिल्या धारेचं पाणी, किंवा गोव्यात mineral water च्या obsession मध्ये रिचवलेल्या कितेक बॉटल्स मधलं पाणी, bike वरून पावसातून येताना तोंड "आ" करून पिलेलं virgin पाणी. हे सगळ आठवलं.
ती just पाण्याची टेस्ट नव्हती तर तो स्पर्श, तो feel होता पितानाचा. तोच missing होता आता. आणि आता तो स्पर्श देणारे ओठच बधीर झाले होते.

just because of that 7.3 cc anesthetic liquid.
Anesthesia - The condition of having sensation(including the feeling of pain) blocked or taken away.
This anesthetic prevents the sensation going towards brain.

म्हणजे काय तर शेवटी स्पर्श म्हणजे neural veins ने पाठवलेले सिग्नल्स.
स्पर्श होतो , स्पर्श कळतो असं काही नसतं. signals transmit , receive होतात हेच खरं. जसं number dial केला कि कोणाला तरी फोन लागतो तसं.
म्हणजे ओठाजवळच्या nerve ने 'x7df4' सिग्नल पाठवला कि समजायचं कि हा विहिरीच्या पाण्याचा स्पर्श आहे. "k155" असा सिग्नल आला कि मेंदूने समजायचं कि दुसरे कोणते तरी ओठ user च्या ओठांना स्पर्श करत आहेत. As simple as that.
Science sucks this way.
म्हणजे
तुम्ही जे पाहत आहात ते just RGB values चे pixels आहेत. आणि शेवटी colors म्हणजे पण just waves ! so आपण 'बघतो' म्हणजे काही विशेष करतो असं नाहीये. अनेक waves ला डोळ्यातील sensory nerves interpret करतात आणि मिळून एक सिग्नल तयार होतो. तो जर जुन्या एकाद्या saved सिग्नलशी match होत असेल तर कळत कि आपण google webpage बघतोय.
त्यामुळे तसेच सिग्नल्स तयार करता आले आणि मेंदूला पाठवले तर मोरपीस डोक्याला लावलेला कृष्ण प्रत्यक्ष दिसला असे कोणतीही मीरा म्हणू शकेल.
तसाच same सिग्नल जर taste-buds ला परत दिला तर octopus च्या शेपटीची चव परत मी चाखू शकेल.
चायला इतक्या मस्त भावनांच्या मागे शेवटी असे रुक्ष electronics !

उगाच science शिकलो असं वाटलं. हे सगळं माहिती नसतं तर किती बरं झालं असतं. स्वतःच्या senses चे गोडवे गात बसलो असतो मी.
गोष्टी माहिती नसण्याचा आनंद वेगळा असतो. मागे ओढलेली खेळण्यातली गाडी इतकी पुढे कशी काय जाते ? याच कुतूहल लहान मुलाला जास्ती असते . एकदा का त्याच्या मागचे "spring tension" त्याला कळले कि त्याचा रस जातो. आता मृत्यूच उदाहरण घ्या. आता मृत्यू अचानक आहे , अनाकलनीय आहे म्हणून त्याच्या बद्दल इतकी उत्सुकता आहे. पुढे जाऊन कोणी जर काही formula काढला शोधून Death-Date calculation चा तर मृत्यू मधला रस पण जाईल लोकांचा.

neways. पण एकूणच आदर वाढला स्वतःच्या शरीराबद्दलचा.
(अंकुर ला फोन केला. त्याला paralysis झाला होता. फोन उचलला नाही त्याने. कसा आहे तो काय माहित. मनात विचार आला 'आपले पण senses असे गेले तर ?'. अंगभर सणक गेली एक. )
अजूनही दुसरयाच दुःख feel करू शकतो म्हणजे मन बधीर नाही झालाय अजून...

good that i am still feeling something. from around 25 years.

Sunday, October 18, 2009

Same Pinch

'रात पश्मीने की' च्या 'मेरा ख्याल है' मधे गुलजार म्हणतात....
"...उम्मीद भी है, घबराहट भी की अ़ब लोग क्या कहेंगे, और इससे बड़ा डर यह है कहीं ऐसा न हो की लोग कुछ भी ना कहें !! "
जितका प्रभाव गुलजारचा आहे तितकाच मृणालचा पण :D

No Parking !

मग दिवसभर ती प्राजक्ताची चुकार फुलं तुझी आठवण करून द्यायचे...

रात्रि मुद्दामच तुमच्या कुंपणालगत माझी गाड़ी पार्क करायचो मी. रस्त्यावर डोकावणार्या प्राजक्ताच्या बरोबर खाली... सकाळी मग प्राजक्ताच्या नाजुक, ओलसर फुलांचा सडा पडायचा रस्ताभर. माझ्या गाडीवर पण त्यांचा नाजुकसा थर जमायचा.
तुझ्या वाढदिवसाला लावलेला तो प्राजक्त , रोज त्याला पाणी घालताना पुसटशी दिसणारी तू आणी त्या फुलांचा माझ्या गाडीवर होणारा ओलसर स्पर्श !! इतकाच काय तो संबंध आपला !
अणि दिवसा-आड़ न चुकता तुझे बाबा मला शिव्या घालत माझ्या गाड़ीतली हवा सोडून द्यायचे... मग उशीर झालेला असुनही मी गाड़ी पुढच्या चौकात ढकलत न्यायचो. गाड़ी न पुसता, फुलं तशीच ठेउन, प्राजक्ताच्या मंद गंधात गाड़ी रेटत रहायचो.

आणि मग कधी गाडीला किल्ली लावताना एखादे फुल शेजारी हसत असायचे...
कधी वेगात निघालो तर स्पिडोमीटरच्या बाजूला कोपर्यात एखादे घाबरून बसलेले असायचे...
कधी एखादे फुल किक मारताना दुखावालेले असायचे...
निवांत कधीतरी मागच्या सिट वर पडून रहायची काही फुलं...
अणि कधितर मागचं सिट काढलं की त्याखाली पण "Surprise !!" म्हणत हसणारी काही फुलं सापडायची.... जिथवर पोहोचू शकणार नाहीत असं वाटलेलं तेथेही गुपचुप पोहोचलेली असायची.....
फुटरेस्ट, साड़ी-गार्ड मधे कुठेकुठे वेलबुट्टी सारखी सजुन बसायची काही फुलं.....

मग दिवसभर ती चुकार फुलं तुझी आठवण करून द्यायचे ...
तुमच्या 'नो पार्किंग' मधे गाड़ी पार्क केल्याचे हे फायदे...

नाहीतरी मनाला तरी कुठं कळतं स्वताला कुठं 'पार्क' करावं ते !!!

Friday, October 16, 2009

...अतीच! हे म्हणजे काहीही ..

कधी कधी खुप बोलायची उबळ येते. अगदी किती बोलू - किती नको असं होतं अशावेळी. मग लिहितो काहीतरी ...........

असं वाटतं की तुझ्याशी नुस्तं बोलत रहावं. जगातली जितकी मूळाक्षरे आहेत त्या सगळ्यांची Permutations & Combinations होउन जितके शब्दं तयार होतील ते सगळे सांगावेत तुला. Dictionary मधे असणारे - नसणारे, अर्थपूर्ण-अर्थहीन, लहान -मोठे, साधे-जोडाक्षर, veg-nonveg -अगदी सगळे शब्दं तुझ्याशी बोललेलो हवं मी. असा एकही शब्दं नको की जो तू माझ्याकडून ऐकलेला नाही. आणी ते सगळे शब्दं माळुन तयार होणारी सगळी वाक्यं पण.... निरर्थक - प्रश्नार्थक - उद्ग़ारवाचक- अर्वाच्य अगदी सगळी सगळी वाक्यं तुझ्याशी बोलाविशी वाटतात. तोंडदुखेपर्यंत, कान फाटेपर्यंत किंवा bore होउन चक्कर येइपर्यंत.
मला पहायचय तुला माझे शब्दं झेलताना. रंगीबेरंगी बुरखे घालून आलेले शब्दं, latest fashion करून आलेले शब्दं, कधीकधी उगीचच आलेल्या या सगळ्या शब्दं-जंजाळात न अडकता त्यात 'मला' शोधणारी 'तू' मला बघायचिये....

माझ्या सगळ्याच क्षणांना तू साक्षीदार हवीयेस. जेवताना मिठाचा खडा लागला तरी तू समोर जेवत असावीस माझ्या, गाडीची किक तुटेल त्यावेळी कळवळताना तू मागे बसलेली हवियेस. तुझ्या केसांच्या गुन्तावळीत पांढरा केस सापडला तर तूच हवियेस मिश्किल हसताना. समोर. घाईघाईने ऑफिससाठी आवरताना तू समोर आलीस की तुझ्या गंधाने भारलेले, तुझ्याच अवतीभवती घुटमळनारे-रेंगाळलेले क्षण हवेत मला. माझ्या अंगावर राहिलेला तुझा चुकार केस ऑफिसमधे सापडला की सरलेली रात्र आठवताना मला तू हवियेस समोर - लाजलेली . पहिल्या पावसाचा पहिला शहारा अंगभर फुलायच्या आधीच तू शहारून मला चिकटलेली बघायचिये मला. रात्रि दचकून उठलो की शेजारी हलकेसे हसू ओठांवर ठेउन शांत झोपलेली तू हवीये. एकुनाच्या एक क्षण Share करायचेत मला तुझ्याशी. अगदी निमिषाची पण वाटावाटी...


सगळे स्पर्श मला तू असताना अनुभवायचे आहेत. पोटातल्या बाळाचे मंद ठोके, त्याच्या नाजुक हालचाली ऐकताना तू हवियेस. त्याच्या जावळाचा स्पर्श, त्याच्या लहानग्या बोटांन्ना हात लावताना तू हवियेस सुजलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे कृतार्थपणे पहाताना. दात येतानाच्या लाळेचा स्पर्श, त्याचा दुधाळ वास मला अनुभवायचाय तुझ्या बरोबर. कपाळावरच्या पहिल्या काही आठ्या, पहिल्या काही सुरकुत्या उगवताना तू हवियेस बरोबर माझ्या.खोकल्याची मोठी उबळ आली की पाठीवर तुझाच हात हवाय मला.सगळे गंध, सगळे स्पर्श अनुभवत असताना तू हवियेस मला बरोबर.

घडून गेलेले पण क्षण तू माझे बोट धरून जगुन आलेली असावीस किंवा घडुशी वाटणारी सगळी स्वप्नं बरोबरच बघितलेली आपण. तू येण्या आधीच्या सगळ्या आठवणी पण तुला ओळखत असाव्यात. भीमाशंकरच्या जंगलातल्या शेवाळलेल्या कातळांपासुन तर अंग बधिर करणार्या प्रवासाच्या आठवणी, दहावी 'अ'च्या मागुन तिसर्या -खिड़कीजवळच्या, गुळगुळीत बेंच पासून तर ४ पांघरुणं घेउन काढलेल्या आजारपणाच्या आठवणी. माझ्या सगळ्याच आठवणी तुझ्या ओळखिच्या व्हाव्यात.
'माझं' सगळच आयुष्य 'आपण' म्हणुन जगायचय मला ..........

--------------
...अतीच.... जास्तीच.... उगीचच... फ़ुकटच...लैच बिल झालं ......हे म्हणजे काहीही झालं आता ...
एक वेळ एखादं 'अनाहत' बेट मागायचं किंवा मस्त Audi/BMW कार मागायची, निळ्याशार बीचला लागुन बंगला मागायचा एकवेळ. अगदीच हे नाही तर गेला बाजार MacBook/iphone, भारी Bike, Plasma टीवी तरी...
हे काय शब्दं, गंध, स्पर्शं यांचे डोहाळे ?