Thursday, April 28, 2011
फ्लायओवर
Tuesday, December 28, 2010
तहानलाडू - भूकलाडू
काय असतात खरच हे तहानलाडू-भूकलाडू?
कसे दिसतात? कसे लागतात? चव कशी असते? आवडतील का आपल्याला? नाही आवडले तर कशाबरोबर तोंडीला लावावेत? किती दिवस टिकतात? भागते का तहान? भागते का भूक? मावतात त्या पुरचुंडीत? किती लाडु बरोबर घे
गोष्टीमधले लोकं/प्रवासी नेहमी
मग खूप थकून-माकून ते बसतात एखा
गाठीला बांधलेली आपली पुरचुंडी
मग प्रवासी ते लाडु खातात. प्रवासाचा शीणवटा जातो
नव्या उत्साहाने परत प्रवास चा
Monday, November 8, 2010
Old Monk
Anchor समुद्राच्या एखाद्या कपारीत, कोनाड्यात अडकणार... anchor ला ती कपार धरून ठेवणार...
२-३ मोठे दगड, कातळ मिळून ती कपार किंवा कोनाडा तयार झालेला असणार...
त्या दगडांना मग जमिनीने घट्ट धरून ठेवलेले असणार...
जमीनपण काय तर पृथ्वीचाच भाग... पृथ्वीनेच तिच्या गुरुत्वाकर्षनाने जमिनीला धरून ठेवलेले असणार....
पृथ्वीला सूर्याने त्याच्या गुरुत्वाकर्षनाने जखडून ठेवलेले असणार...
सूर्यहि अंधारात "कशाला" तरी टेकून उभा असणार...
"कशाला" हि गोष्ट पण कोणाच्या तरी आधाराने तरलेली, तगलेली, बाकीच्यांना आधार देत उभी असलेली..
जहाजाने आपण भरकटलो म्हणून "कशाला" हि जबाबदार धरू नये....उठसूट कशाला "त्याला" दोष द्यायचा ?
साला....नियती इतकी बेक्कार असते ना..
आपल्याला वाटत असतं आपण नेहमीचा रस्ता सोडून वेगळ्या रस्त्याने जातोय ते आपल्या मर्जीनेच ...
..पण असं नसतं, आपल्याला दोन रस्ते मिळणार आणि त्यातला वेगळा रस्ता आपण निवडणार हेच ठरलेलं असतं... Choice नसतोच तो, उलट उगाच आपल्याला खेळवणं असतं ते....
........तो निर्णय आपल्या मनाने घेतला म्हणून आपण खुश असतो आणि वर कोणीतरी हसत असते..
घसरगुंडी वरून लोक मजा करत खाली येत असताना आपण तिच्यावरून उलटीकडून चढत असतो.. आपल्याला वाटत असतं आपण प्रवाहाविरुद्ध चाललोय...
........आपण प्रवाहाविरुद्ध पोहण्याच्या कैफ मध्ये असतो आणि वर कोणीतरी हसत असते..
.......आपण flow बरोबर न जाता आपला वेग आणि रस्ता आपणच ठरवतोय या समाधानात असतो आणि वर परत कोणीतरी हसत असतं..
मग आता मी हे सगळं लिहिणार आणि तरीही नियतीचे अस्तित्व नाकारणार, स्वतःला पटेल तेच करणार...स्वतःच्या निर्णयांची जबाबदारी स्वतःच घेणार. आणि ते घेतले म्हणून मी माझ्याच नजरेत उतरणार किंवा उंचावणार..
....आता मात्र अजून खूप वर दोघांकडे कौतुकाने बघून तिसरंच कोणीतरी हसत असतं..
९०..
Tuesday, June 22, 2010
Rape me !
Monday, May 3, 2010
'cliché' च्या ऐवजी दुसरा शब्द पाहिजे होता !
Monday, March 29, 2010
Anniversaries, Celebrations and a pinch of Bullshit !
हो ना, वर्षातून इन-मिन ५-६ Anniversaries येतात - २ वाढदिवसाच्या, एखादी engagement ची, लग्नाची, १ first date ची आणि अजून २-३ किरकोळ Anniversaries....
खरंच इतक्याच Anniversaries असतात वर्षात ?
कि ..........
पहिल्यांदा नजरेने खुणावलेल्याची Anniversary, पहिल्यांदा ओठभर हसल्याची Anniversary, पहिल्यांदा डोळे भरून आलेल्याची Anniversary.....
रस्ता क्रॉस करताना चुकून झालेल्या पहिल्या स्पर्शाची Anniversary, माझ्या कानात कुजबुजताना -पहिल्यांदा श्वासाच्या अंतराइतकी तू जवळ आल्यावर- आलेल्या शहाऱ्याची Anniversary आणि मग दोघांनी एकाच लयीत श्वास घेण्याच्या वेड्या प्रयत्नाची Anniversary.
पहिल्या McD च्या बर्गरची Anniversary, आणि नंतर एकदा बर्गर खाताना बाजूने mayonnaise निसटलेले असताना आणि ओठांजवळ राहून गेलेले असताना, ते पुसताना माझ्या बोटांना झालेल्या तुझ्या ओठांच्या पहिल्या निसटत्या स्पर्शाची Anniversary.
पहिल्यांदा बाईकच्या मागच्या धूळवट सीटवर एकाच बाजूला दोन्ही पाय ठेऊन, (सुरक्षित) अंतर ठेऊन बसल्याची Anniversary आणि नंतर पहिल्यांदा दोन्ही साईडला पाय टाकून (जरा) जवळ बसलेली असताना, अचानक खड्डा आलेला असताना, अनपेक्षित- करकचून दाबलेला असताना पहिला "Current" बसल्याची Anniversary किंवा मग बाईकवर मला गच्च चिकटून, थकून मागच्या मागेच झोपी गेल्याची Anniversary.
फोनवर पहिल्यांदा भांडलेल्याची Anniversary, केवळ miss call देऊन-देऊन मनावलेल्याची Anniversary. जगातला सर्वात मोठा SMS केल्याची Anniversary आणि फक्त blank sms करून तुला खूप काही सांगितल्याची Anniversary.
३९ वेळा "Bye-Bye-c u-GN" म्हणूनही chat चालूच ठेवल्याची Anniversary आणि पहिल्यांदा दूर जाताना डोळ्यात भरलेलं आभाळ लपवलेल्याची Anniversary.
पहिल्यांदा एकत्र बर्फाचा गोळा खाल्ल्याची Anniversary आणि मग बर्फामुळे बधीर झालेले तुझे ओठ माझ्या गालावर टेकल्याची Anniversary.
एकत्र बघितलेल्या पहिल्या सूर्यास्ताची Anniversary आणि चांदणं झेलत पहाटेपर्यंत जागून सूर्योदय पाहत झोपी गेल्याची Anniversary.
दिलेल्या पहिल्या रानफुलाची Anniversary, पहिल्या माळलेल्या वेणीची Anniversary आणि तुझ्या केसांच्या आणि गजरयाच्या मंद-Mix-मादक गंधाने भारल्याची Anniversary.
Shining मारण्यासाठी JM Road वरच्या पोराकडून बळेच घेतेलेल्या १३ फुग्यांची Anniversary, contest मध्ये पायाने फुगे फोडल्याची Anniversary, पहिल्यांदा फुगे वापरल्याची आणि मधेच फाटलेल्याची Anniversary.
सातव्या पावसात उगीचच चिंब भिजलेल्याची Anniversary, तुला पहिल्यांदा ओलेती पाहिलेल्याची Anniversary, घामानी डबडबलेल्या शरीरांनी थकून, संगीत ऐकत पडलेल्याची
Anniversary.
तरीही मोजून १३५२ च होतात Anniversaries वर्षातून.....
किती क्षण असतात एका वर्षात ? शाळेत शिकवलंच नाही कधी क्षणाचं गणित. त्यामुळे माहितच नाही ..........
Sunday, February 14, 2010
ग्रेस
Sunday, February 7, 2010
Black *TONG*
Tuesday, December 29, 2009
भूल
Sunday, October 18, 2009
Same Pinch
Sunday, September 13, 2009
(Be)Foreplay / Making of Rapunzel
ठीके बास झालं पाल्हाळ ... तिकडे गार्बो सुरु होण्याआधीच इन्टुक ने पकड़ घेतलेली असते आणी इथे ५ ओळी झाल्या तरी मुद्द्याला हात नाही :)
पँझी : इंटुक ...ऐ इंटुक...... तू का नाही रे लिहित असं ?
इंटुक : कसं ?
पँझी : कसलं रोमांटिक लिहिले याने बघ ... मलाच जरा horny वाटायला लागलय वाचून ...
इंटुक : despo झालायस तू पँझी....रोमांटिक वाचून इरोटिक वाटणं बरं नाही...
पँझी : चायला...आता झालो तर झालो horny. तुझ्या सारखा जख्ख नाहीये मी. बघ ना आता, भर गर्दित इतके जवळ आलेत ते...काही कोणाची, कशाची पर्वा नाहीये . खुप वारा सुटलाय सोबतीला... just दोन बोटं अंतर उरलय ओठांमधे त्यांच्या. ....आणि ...आणि .....आता माझेच ओठ ...........काय म्हणतात त्याला ------ इंटुक, त्याला काय म्हणतात रे ?? ते जसे हात सळसळतात , शिवशिवतात. तोंडाला पाणी सुटतं तसं रे ...अंगाला खाज सुटते तसं... "ओठ" काय होतात ? सांग ना ... "ओठ लसलसने का ?" नाहीरे ...
इंटुक : स्वर्ग २ बोटं उरणे ....
पँझी : नाहीरे.."बालभारती" नको सांगुस ..."ओठ काय होतात ?" ते सांग ...तू नाही वापरला का असा काही वाक्प्रचार कधी ?
इंटुक : नाही बाबा ..अशा गोष्टी लिहिन्यापेक्शा केलेल्या बऱ्या. कुठं शब्द शोधत वेळ घालवायचा ..नाहीकारे श्रीमंत ?? विचार श्रीमंतला. त्याचा "Global Experience" आहे बाबा. बोला श्रीमंत तुमचे "ओठ" काय "होतात" अशा वेळी ?
श्रीमंत : हा हा हा ... Depends म्हणजे ...पलिकडे कोण आहे यावर .... साला पँझी मलाच विचारात पाडलस तू ..थांब जरा वेळ. मी आठवून बघतो.
इंटुक : पँझी ...बघ पकड़ श्रीमंत ला. तोच सांगेल. आमच्याकडं खुप VEG लिहावं लागतं बाबा... म्हणजे Lubrication घ्यायचे ते पण "साजुक तुप" असं... "सात्विक प्रेम" असतं बाबा साहित्यात :) बोल श्रीमंत....
श्रीमंत : बौबी होती ना तिचे ओठ अंजेलिना जोली सारखे होते मोठेमोठे. काहीच वाटायचं नाही त्यावेळी. आणी संजना -तिचे तर लांबच लांब. सम्पायचेच नाहीत ... जूलिया रॉबर्ट सारखे ..आडवे केळ खाऊ शकणारे ...पण जुईली माल होती एकदम ...तिचा वरचा ओठ लहान होता - नाजुक एकदम ... थरथरायचा मस्तपैकी ....गेल्या साल्या सगळ्या मजा मारून निघून. पँझी कशाला त्यांची आठवणी काढायला लावलीस ?
इंटुक : मुद्द्याचं बोल श्रीमंत. उगाच ओठांची मापं सांगू नकोस ...
पँझी : अरे कसला भारिये हे... "ओठांचं माप.." ...अमेझिंगे रे हे ...
"डार्लिंग, तुझ्या ओठांचे माप घेऊ देत मला..."....नाहीनाही अगदी रानटी वाटतं हे... तरल हवं काहीतरी.
इंटुक .... हे कसयं
"प्रिये ये निघोनी ढगांच्या कडेने ..मला तुझ्या ओठांचे माप घ्यावेसे वाटताहे " ... इंटुक ...वापर नारे हे.
कसलं भारी आणि कधी वापरलेलं पण नाहीये कोणी..
इंटुक: टेलर आहे का मी ? ओठांची मापं घेउन स्टोरी लिहायला?
श्रीमंत : नाही इंटुक. बरोबरे पँझीच. लिही काहीतरी यावर. एखादी मस्तं story... नेहमीचं तुझं भंकस सोडून।
इंटुक : असलं उथळ लिहित नाही मी श्रीमंत ..... अरे एखाद्या GF-BF च्या teenage story सारखं वाटतय. आणी शिवाय हे "ओठांवर" लिहिलं की एक्सेप्ट नाही करत रे लोक.. स्टोरी कमरे खली घसरली की लगेच यांच्या भुवया उन्चावतात .. असं अगदी उच्च प्रेम लागतं यांना..Idealist , त्यागमय वैगेरे असेल तर अजुनच भारी. असं डायरेक्ट कोणत्या पण रोमांटिक स्टोरीमधे नाही टाकता येणार हे वाक्य..
पँझी : मग काहीतरी वेगळी स्टोरी काढ. सेंटी वाली आणि मग त्यात टाक हे.. टाकच पण हे इंटुक... माझी शप्पथ आहे तुला..
श्रीमंत: पँझी येड्चाप आहेस कारे ? शप्पथ कसली घालतोस ..
इंटुक : ऐका "प्रत्येक क्षणी एकत्र रहायची शप्पथ घेतली होती दोघांनी ..पण आता ते वेगळे आहेत एकमेकांपासून.. खुप लाम्ब .. परिस्थितिने दूर केलय त्यांना.. टिपिकल सॉफ्टवेर लोकांची स्टोरी रे.. नवरा टोकियो तर बायको london ला.. फुल हाई प्रोफाइल LoveStory ..अणि मग त्यांची फ़ोनवरचि संभाषण.. रोमांटिक वाली..अंतर हजार मैलांचे अणि गोष्टी intimate अगदी ....
श्रीमंत : "Distance Loving" गुड आहे ... पण मग यात सेंटी काये ?
पँझी : का बरं लांब रहाताहेत ते ? काही reason ? एकत्र राहून मजा करायची सोडून ..
इंटुक :काही अपरिहार्य कारण पँझी ..
पँझी : कोणती ....? पैसा ?
इंटुक : हा चालेल ते कारण पण ..
श्रीमंत : इन्टुक पैसा हे खुप टिपिकल कारण झालं यार .. यात आता लोक गुंतत नाहीत .. काहीतरी वेगळ कारण काढ..
इंटुक : बरोबरे .. पैसा फॉर बंगला, गाड़ी नको ..काहीतरी Genuine Reason हवं .. पैसा फॉर डेब्ट पण खुप लो सोसायटी होतं . ओके ..पैसा फॉर आजारपण ...
पँझी : हो ..Cancer Treatment ..आईला कैंसर आहे त्याच्या ..किंवा घरातल्या कोणाला तरी ...
इंटुक : चालेल पण ..अजुन वाईट थोडं. जास्ती relate व्हायला हवं लोकांनी.
श्रीमंत : नको रे इंटुक .कैंसर नको..कैंसर एइकला की मला ती ChemoTheropy आठवते.. मग ते डोसेस..ते हाल त्यांचे ..केसं गेलेली मानसं.. लांब सड़क केसांच्या, बार्बी सारख्या डोळ्यांच्या जुलीला पाहिलेलं. भुवयांचे केस गेलेले. लांब सड़क केसांच्या ऐवजी टक्कल नुसतं...नकोच ते ..
इंटुक : एईक तरी ...Rapunzel ची स्टोरी माहितीये तुला ? एकदम लांब केसांची राजकन्या- ४ मजले लांब वेणी ..तिला जर कैंसर झाला तर ? जातील सगळे केस तिचे ? का Fairy ला नाही होत कैंसर ? माणसांनाच होतात ? की माणसांच्या Fairy ला ? त्यांच्या मुलीला झालाय कैंसर आणि तिच्यासाठी पैसे ग़ोळा करायला तो तिकडे आहे आणि ती इकडे एकटी.. दोघं लढत आहेत आपल्या आपल्या फ्रंट वर .. मग कसला आलाय सेक्स, रोमँटीकपणा ... त्यापेक्षा खुप जास्ती असत पँझी जगात ..वाकय म्हणुन चांगले आहे हे. पण शेवटी .. "कसा आहेस ?" "एकटं वाटतय ?" "कधी येनारेस परत " असी वाक्यं जास्ती जवळ वाटतात.. शेवट लग्न म्हणजे फ़क्त शरीर नसतं....
पँझी : मान्य आहे पण लहान मुलांना नाही आणयचा आजार कधी तू ..
श्रीमंत : हो इंटुक .. स्टोरीसाठी कशाला कोणाचा जीव घ्यायचा ? मुलांना मारायच नाही .. नको लिहू त्यापेक्षा काही .. राहू देत.. तू आता पक्का लेखक बनलायस .. लोकाना रडवा अणि पैसे मिळवा ..
इंटुक : हेच विकतं आजकाल.. हीरो किंवा कोणी मेला शेवटी की movie Hit.. असं बघा आपल्या Rapunzel ला टकलं कसं पाहावेल राजाला ?
पँझी अणि श्रीमत : (एकदम) ... बस कर इंटुक ...
पँझी : नको लिहुस इंटुक, सॉरी में तुला भरीस पाडलं.. सगळा मुड घालवलास तू .. श्या ..चल श्रीमंत बाहेर जाउन येऊ ..
इंटुक : ठीके..नाही मारत कोणाला.. just indirect उल्लेख..की कोणाला तरी झालाय may be बायकोला त्याच्या .. ओठ काळेनिळे झालेत तिचे weakness मुळे .. तिला लिपस्टिक देऊ पाहतोय तो ..परत आधीसारखी करायला ...चालेल आता ?
पँझी : गरज नाहीये इंटुक आता मला तुझ्या स्टोरीची..
इंटुक : पण मला आहे ना आता .... मी लिहिणारे ...अणि नाव पण देणारे "Rapunzel" अणि परत "मेकिंग ऑफ़" ची ही Discussions पण ...
पँझी अणि श्रीमंत : राग येतो मला तुझा इंटुक खुप ... निर्लज्ज आहेस तू ...अणि दगडपण
---
गार्बोच्या पुस्तकाच्या फ्रंटपेजवर गार्बोचं चित्र आहे..फुलांचा गाऊन घातलेली ती अणि तिच्या पोटात इंटुक , पँझी अणि श्रीमंत याचं चेहरे आहेत... पोटात कोणाचं मूल आहे ते नाही माहित म्हणुन ...
गार्बोच्या गर्भात हे तिघे असतील..पण सगळ्यांच्या डोक्यात हे तिघे असे असतात .एकमेकांना मारत, चिडवत , डिवचत ... कधी desperate पँझी जिंकतो कधी निर्लज्ज इंटुक तर कधी मन मोकळा श्रीमंत जिंकतो ....
यावेळी पण इंटुक जिंकला माझ्यातला. वाईट वाटतय ..अजुनही वळु का ?
Sunday, August 23, 2009
आमचेयेथे "चीन" येथील सर्वांगसुंदर, शास्त्र-शुद्ध गणेशमूर्ती मिळतील..
नाही नाही , हा पोस्ट अजिबात "Consumerism-Enoughism" वर नाहीये. किंवा "चीनी Dragon चा भारतीय बाजार पेठेत झालेला चंचुप्रवेश" यावर ही नाहीये. अथवा पुणेरी-पेठी संस्कृति वरची टिका वगैरे पण नाही. "पेण", "शाडू", "eco-friendly festivals" या असल्या नविन आलेल्या फैशन वर तर नाहीच नाही. या विषयांवर बोलायचा माझा अभ्यास नाहीये, लायकी नाहीये त्याहूनही जास्ती म्हणजे "interest" तर नाहीच नाही.... मी बरा, माझा ब्लॉग बरा, माझे slices बरे. आठवणीच्या पिकाला कधी दुष्काळ नसतो माझ्याकडं .....
"श्री सिझनल्स" च्या पत्राने आठवण झाली. "चला जाउन गणपति Book करायला हवा". गेलो. तिसर्या मिनिटाला शाडूचा, पेणचा, एको-फ्रेंडली गणपति बुक केला. नाहीतरी पेणचे बहुतेक गणपति सारखेच दिसतात - टापटीप, एकाच मापाचे, थोड़े लम्बुळके तोंड, सोंड, तब्येत पण slim जरा. अगदीच सदाशिवपेठी वाटतो तो किंवा "को.ब्रा.".गाडीवर मागे बसलेलो त्याला घेउन. हातभार उंचीची मूर्ति, अगदी मूर्तीचे कान छातिपर्यंत आलेले माझ्या। जणू कान लावून माझ्या हृदयातलं-मनातलं ऐकतोय.... १० मिनिटात घरी।
गाँधी मैदानात गेल्याशिवाय गणपति घेउन यायचो नाही मी. अरे कित्ती दुकानं ती गणपतीची, शोभेच्या items ची, प्रसाद-गुलालाची.... आणी त्या भूलभुलैया मैदानात आलेले हजारो गणपति।
अगदी लहान-innocent बाल-गणेश - इतका cute की असं वाटावं की मित्रच माझा बसलाय मास्क घालून....
Ditto शंकरावर गेलेला, निळ्या रंगाचा,जटाधारी पोरगेला गणेश...
आई-वडिलांच्या मांडीवर बसलेला लहानगा गणपति...
कधी सुंदर मोरावरचा slim गणेश तर कधी ढोल्या उन्दरावरचा पोट संभाळत बसलेला लट्ठ गणपति।
ख़ास "बागडपट्टी स्पेशल" श्रीमंत बालाजी-गणपति...
किंवा दरवेळी अगदी same pose मधे बसलेला, उगाचच-श्रीमंत आणी त्यामुळे जास्तीच लट्ठ वाटणारा , आपल्यातला नसलेला - दगडू"शेठ" (choice करायला सर्वात सोप्पा )
मुकुट न घातलेला, मस्त middle-aged, थोडं टक्कल पडलेला आणी पोट जरा जास्तीच सुटलेला गणपति...
किंवा अगदीच शांत, तटस्थ भाव असलेला, अगदी कोरीव डोळ्यांचा, mature गणपति .....
अरे किती प्रकार , किती स्वभाव, किती रंग आणी किती रूपं...शिवाय किती sizes ...
शेवटी सगळं फिरून मन भरलं, वडिल चिड-चिड चिडले की ओळखीच्या सरांकडं जायचो -स्वस्तात मस्त मूर्ति मिळायच्या. मग एक मोठी - नेहमी वेगळी - भारीवाली गणेश मूर्ति घेउन २ तासाने घरी ........
गरीब बिचारा सुन्या पण मग त्याच्या लहान बहिनिसाठी लहानशी - तळव्यात मावणारी मूर्ति घेउन यायचा. मग आमची मूर्ति मोठी -"हातभर" अन् त्याची लहान "३-४ इंचभर" हे बघून अजुनच जास्ती आनंद व्ह्यायचा...
जितकी मूर्ति मोठी तितकी भक्ति मोठी ! समाजाचं वय लहान मुलाइतकं असतं हे पटलं मला आता ...
खरं तर गणपतिशी तसं वाकडं नाहीये माझं. तो बिचारा बुद्धिदेता. आणी मला पण ठीकठाक मिळलिये ती. शिवाय त्याने कोणाचं वाईट केले आहे असं पण नाही. पुराणात पण त्याच्या वाटेला "शाप देण्याचे" scenes पण कमीच आलेत. एखादा दुसराच आणी तो पण "बालसुलभ शाप" (लहान मूलं पडल्यावर अंगाला लागल्यापेक्षा कोणी हसलं की जास्ती रडतं तसं). त्यामुळे गाडीवर त्याला घेउन बसलो होतो तेव्हा वाटलं इतका जवळ आलय तर काहीतरी बोलावं त्याच्याशी. mouse आहे म्हणा त्याच्याकडं पण इन्टरनेट नसेल तर माझा ब्लॉग कसा वाचता येइल त्याला ? ऐकला असेल का monologue त्याने माझा ?
Jokes apart !!
पण आता मोठा झालोय मी. माणसांची गर्दी आणी गणपतीच्या प्रतिमांची गर्दी सारखीच वाटायला लागली आता. मूर्तितला innocence , भाव-बिव , त्याची रुपकं समजन्या इतका मीच innocent राहिलो नाही. त्या सुपा इतक्या कानाच्या, लट्ठ पोटाच्या , सोंडेच्या, आतल्या मेंदूच्या सगळ्या कथा-कल्पना किती फोल आहेत ते पण कळलंय आता. नवस-सायास, कौल, सांगणं-ऐकणं-मागणं, हार दूर्वा चंद्रोदय यात मन भूलत नाही. नसलेल्या श्रद्धेचा बाजार पण मांडता येत नाही आता. मी आणी सुन्या एकच वाटतो आता. तो बहिनिसाठी आणी मी घराच्यांसाठी मूर्ती आणतो.
मग आता "चीन" काय अन् "पेण" काय .....