ती : ऐक ना ... माहितीये रे मला. आता इतक्या टेस्ट केल्यात अजुन एकच ... may be यावेळी Counts वाढलेला असेल... हे magazine घेतोस ?
तो : कशाला चेष्टा लावालियेस आता ? u know that !
(ती वाकून magazin खाली ठेउन देते ... आणी त्याच्या कड़े बघत)
ती : आपल्याला फ़क्त 1 हवाय रे. शेवटपर्यंत पोहोचनारा. healthy ! फ़क्त एक सगळं अंतर पार करून जाणारा... आठव ना मी जवळ असतानाचे सगळे क्षण...अजुन एकदा...
तो : (हसून) सगळं अंतर पार करणारा.... जवळ-लांब असं कधी वाटलंच नव्हतं ग कधी... आताच काय ते "अंतर" कळतयं..कसं सांगू तुला काय काय आठवतं मला आत गेल्यावर....
कसं सांगू मी तुला काय काय आठवतं ते ... अगदी सगळे क्षण न क्षण आठवतात, त्याच्या आजू-बाजुच्या गंधा- स्पर्शा सकट.. तू खरच जवळ आहेस की नाहीस असा भ्रम होणारे ते क्षण ...
पहिल्यांदा सोडायला आलीस Airport वर ... जसं जसं departure जवळ येत होतं तशी तशी हाताची तुझी पकड़ घट्ट होत गेलेली.. जाणवन्याइतपत! आणी अगदी आत जायच्या वेळी, टपोरे डोळे तुझे -अगदी सांडायच्या बेतात. कोणत्याही क्षणी मिठीत येउन "नको जाऊ " म्हणशील असं वाटलेलं. तेव्हढ्यात सोडलीस तू पकड़ हाताची आणी खाली वाकलिस Documents check करायचं नाटक करून.. दुसर्या मिनिटाला वर पाहिलस.. आणी डोळ्यातलं सगळं आभाळ निरभ्र झालेलं ... मिठी न मारता, ना काही बोलताही केवढा धीर दिलास तू मला .. अगदी आता वाकलिस ना magzin ठेवायला आणी दुसर्या क्षणी normal झालीस तसं. आता हेच सगळं आठवतं ग ...
पहिल्याच Airport वरून लगेच फोन लावला तुला. 1000 मैलांचं अंतर ते अर्ध्या रिंग मधे फोन उचललास. थोडा वेळ काही बोललोच नाही आपण. मधे होतो मी journey च्या. धड ना तुझ्यापासून खुप लांब ना धड तुझ्या बरोबर...काय बोलायचं असतं अशावेळी ते पण माहित नव्हतं. फ़क्त इतकाच कळत होतं की अंतर वाढतय. काहीतरी बोलत होतीस पण मला सोडल्यावर रात्रभर झोपली नाहीस हेच जाणवत होतं त्यातून... १००० मैल काय किंवा २०००-५००० काय? अंतर तर होतच...
वीकभर आलेलं टेंशन तुला सांगायला रात्रि फोन करायचो. तू अशी सकाळी सकाळी शिकेकाईने न्हालेली. तसेच ओलेते माझा फोन घ्यायाचिस. अणि मग ओल्या झालेल्या फोन मधून तुझ्या केसांचा तो वास माझ्या पर्यंत यायचा. एक दीर्घ श्वास घ्यायचो मी. तुझ्या गंधाने भारलेली माझी ती रात्र ! फोनवर बोलताना मधून मधून केसं झटकायचा आवाज येत रहायचा अणि जणू त्याचे तुषार माझ्याच तोंडावर उड़ताहेत असं होउन जायचं. सगळी tensions विसरून गेलेलो असायचो. तुला सांगू की नको असं करता करता तू केव्हाच ती माझ्याकडून वदवून घेतलेली असायचीस. केसं सावरताना मलापण सावरायला कसं जमायचं ग तुला ?
किती दिवस लांब होतो ग आपण. मी मोजायचोच नाही. मोजले की हमखास वाढायचे ते. 'strip क्लब' ला नेलेलं मित्रांनी तिकडे मला. हो-नको-हो करता करता आत पोचलो. अणि दुसर्याच क्षणी बाहेर आलो. फोन करायचं reason देऊन. 27 वेळा फोन ट्राय केलेला तुला. तू फोन विसरून गेलेलिस. तुझा आवाज कधी एकदा एइकू कधी एकदा तुला सांगू हे असं झालेलं. काहीच कळत नव्हतं काय करतोय मी ते... मला त्यावेळी फ़क्त तुझ्याशी बोलायचं होतं..अणि मग 28 व्या कॉल ला तू फोन उचललास. हाय रे देवा! इतकं हलकं वाटलं होतं तेव्हा. त्या तशा Area मधे पण मला फक्त तूच एइकू येत होतीस. चुकलेल्या लहानमुला सारखं बिलगलो होतो मी तुला. तूच सांग आता magazin कसं वापरू मी यावेळी ?
घरी जाताना आधी Webcam घेतला. मला आता तुला पहायचं पण होतं. असं वाटलेलं की पाहून अंतर कमी होइल..
पावसाची रेष पाहायला बाहेर पडलेलो. खुप पुढे गेलो तरी पाउस संपलेला काही दिसेना. मग अचानक जोरात गारा पडायला सुरुवात झाली. वेड्यासारखे गोळा करत सुटलेलो. छतरी उलटी करून त्यात गारा गोळा केलेल्या. वरुण सपसप गारा पाठीवर बसत होत्या, कधी डोक्यात, कधी मानेवर, कधी ढुंगणावर. वण आलेले अंगभर. अणि साठवलेल्या गारांच छतरी मधेच पानी झालेलं. वेचलेल्या उरल्या-सुरल्या गारा मग खात बसलो होतो कितेक वेळ. रात्रि अंग शेकून घेताना आईने विचारलेलं "सुलीच पण अंग दुखतय म्हणे. बरोबरच गेला होता का फिरायला पावसात ?".. पकडलो गेल्याची आठवण म्हणुन पहिल्या गारा पाठवल्यास. "Waterproof and Temparature- proof " बॉक्सच Courier आलेलं. छोटीशी छतरी अणि पाणी होतं आत. सगळ्या गारा वितळलेल्या डब्यात त्या. मग मी परत त्यांना freezer मधे ठेउन दिलं. Webcam सुरु करून त्या गारा खाऊन दाखवत होतो तुला. चुकून म्हणालो "गारा वितळल्या ग त्यादिवशी सारख्या. अंतर खुप वाढलय का ? ". पागोळ्या लगडल्या लगेच पापण्यांना तुझ्या अणि त्यातला एक टचकन निखळला. सवयीने लगेच sceen कड़े हात गेला माझा अणि मग सगळेच सांडायला लागले. पहावत नव्हतं तुला रडताना, Technical कारण सांगुन webcam off केला. Chat वर सगळे पावसाळे परत जगुन आलेलो आपण. कोण म्हनतं chatting करताना डोळ्यातलं पाणी दिसत नाही ? webcam off करून पण तुला रडताना पाहताच होतो मी. यावेळी किती अंतर होतं आपल्यात ?
खरतर तुझा-माझा चन्द्र एकच होता. तू त्याला सांगितलेल्या कानगोष्टी मग तो मला दुसर्या दिवशी (सॉरी रात्रि) सांगायचा. फ़क्त तुझ्यासाठी अणि माझ्यासाठी त्याचे "Working hrs" वेग़ळे असायचे. पण तरीही महिन्यातल्या 4 दिवसांच्या खुणा माझ्याही कैलेंडरवर करायचो मी. तुझ्याबरोबर प्रत्यक्ष नसलो तरी तुझ्या मूडची जरा जास्तीच काळजी घ्यायचो मग त्याकाळात...त्यावेळी मग तू चिडलीस की जास्तीच अपराधी वाटायचं मला. तू कितीही Control केलस तरी तुझ्या मनातलं बाहेर पडायचं पण तू असं मनातलं बोललेलं आवडयचं मला. माझा माफीनामा मग मी चन्द्राकरवी पाठवायचो तुला.. तितके अंतर बिचारा रोज पार करायचा.