"त्या"ची ती : सांग सख्या रे... आपल्यातलं सगळंच का मांडावं कागदावर ? सगळ्याच मिठ्या का बर शब्दात जोडाव्या ? अगदी अंथ्ररुणातल्या विस्कट्लेल्या सगळ्याच घड्या - "सलवटे" " कागदावर यायलाच हव्या का ? अगदी सगळे हुंदके , हुंकार, अगदी सगळे श्वास शब्दात पकडलेच पाहिजे का ? सगळे गंध, सगळे स्पर्श, सगळे व्रण यांचा बाजार मांडायलाच हवा का ? बोललेलं , न बोललेलं , समजलेलं , समजावलेलं, गृहीत धरलेलं आणी चुकलेलं - सगळं सगळं शब्दमय झालंच पाहिजे का ? चोरटे स्पर्श , चोरटे क्षण, चोरट्या खाणाखुणा आणी लपलेलें
व्रण यांना पकडलंच पाहिजे का शब्दांच्या कोठडित ? असा काहीच नाहीये का जे अगदी आपलं - फ़क्त माझं आणी तुझं ? अगदी private अगदी intimate ! केवळ तुझे - माझे क्षण .... तुझ्या कोणत्याच भावना, तुझे कोणतेच शब्दं असे नाहीत की जे फ़क्त मी ऐकलेत बाकी कोणीच नाही? फ़क्त माझं असं काहीच नाही का ? फ़क्त आपलं असं काहीच नाही का ? सतत कोणीतरी खिडकीतुन बघतय असं वाटतं, सतत कोणीतरी ऐकत आहे असं वाटतं आजकाल. तू असा बेभान होऊन आलास की वाटतं तुज्या कवितेतली एक ओळच घेउन आलायस ,आणी मी ती पूर्ण करणार .. असं काही कानात सांगितलं की वाटतं 'चला याने ध्रुपद म्हटलय आणी वाट पाहतोय माझी कडवं पूर्ण करण्यासाठी' अगदी सगळेच क्षण आजकाल ठरवल्यासारखे येतात रे. काही आतलं सांगितलं तुला की वाटतं आता यावर तू काही तरी लिहिशील उत्तर देण्याऐवजी... तुझ्यातला प्रियकर भेटतच नाही आजकाल, भेटतो तो एक कवि किंवा लेखक आपल्या पात्राशी लगट करणारा ............
तो : वेडाबाई आहेस अगदी !! रुसू नकोस प्रिये.... ऐक सखे सांगतो तुला प्रसिद्ध होण्यापूर्वीचे काही ... कागदन-
कागदं लिहायचो.. वाचलेलं , ढापलेलं , चोरलेलं, इकडून तिकडून जुळवलेलं ...असं काही-बाही लिहायचो... प्रेमावर तर कित्येक पानभर ....वाटायचं असच असेल प्रेम, "Theoretical" होतं प्रेम माझं. वाचून, बघून, ऐकून त्याची व्याख्या केलेली. अगदी साभार परत यायच्या सगळ्या प्रेम कविता. कधी कधी तेव्हडी पण तसदी घ्यायचे नाहीत ते .
मग तू भेटलीस. प्रेम काय असतं ते कळायला लागलं. नविन आकार-उकार कळले , काही नविन गंध काही नविन स्पर्श आणी त्यांचे नविनच अर्थ... आणी मग काही तरी सुचायला लागलं .. तू बरोबर असतानाचा नसतानाचा प्रत्येक क्षण काहीतरी सांगायचा, सुचावायाचा.तेच मांडायचो.. अगदी नविन होतं ते genuine, अगदी माझं ! अगदी नवाच जगाचा शोध लागल्या सारखा झालेलं मला..आणी मग तो शोध सगळ्या लोकांना दाखवावा असं वाटायचं. मग हे सगळं प्रकाशित व्हायला लागलं, लोकांना भावायला लागलं. कुठतरी त्यानां ते फील व्हायचं. होता होता प्रसिद्ध झालो. मग हा खेळ सुरु झाला. नेहमी आधी प्रियकराला पाठवायचो तुज्याकडं , आणी मग कवि हळूच मागुन टिपून घ्यायचा ते सगळे क्षण...सगळं कसं अगदी पाहिजे होतं तसं....म्हणजे पैशाची काळजी पण मिटली, शिवाय indentity पण आणी तू पण मग inspiration वगेरे...
मी पण मग scene रचायचो आणी आधी तुज्याबरोबर तालीम त्याची.. मग रंगली तालीम की लगेच publish ... अजून scenes अजुन तालीम अजुन famous... मी तुझा प्रियकर तर आहेच ग पण कवि सुद्धा आहे की नाही ?
बघ ना आताचीच गोष्ट घे... अशी रुसलीस, अशी भांडलिस. आता तुझा रुसवा घालवायचा पण scene ready आहे माझा.. बघ आता "Celebrity" नावाची कविता झाली पण तयार... नविन कवितासंग्रहाचे नाव पण हेच ठेवुया .. आणी आत "----माझ्या प्रियेसाठी "
आता तरी बोल माझ्या अबोलिच्या फुला ?
Sunday, August 9, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
6 comments:
the best post you ever wrote .
He Apratim lihila ahes tu Amol !
wah mitra..kay chan lihilay.. tu kharach khup khup chang lihitos.. asach lihat jaa ani amha sarvanna anand det ja.. wah ..aabhari ahe i tujha kharach...
Bhari lihile ahe..Waiting for more from you.
@Prafulla-Tuze comments vachun pan khup anand zala.. Asech comments lihit ja.
थेंक्स guys,
अरे अणि हा post अजिबात संदीपवर नाही लिहिलेला. खरच !!
may be गुलज़ारवर पण असेल ... अगदी राखी किंवा सोनिया ला कसं वाटत असेल असं मला वाटलं
so लिहलं may be true for other artists also !!
शप्पथ nothing personal about it !!
agdi manapasun lihila aahes :)
kharach the best post from you :)
khooop aavadla :)
keep it up
Post a Comment