Pages

Sunday, August 23, 2009

ना धड "बे-जमीं" ना धड "बे-आसमां"

"krissh" चा मास्क बघितलाय का? आता इतके भारी face-features आहेत हृतिकचे की संपूर्ण मास्क लावला असता तर 'हृतिक रोशन काय' आणि 'सोहेल खान काय' काहीच फरक पडला नसता ! त्यामुळे अगदी चांगले features झाकायचे नाहीत... टोकदार नाक, जिवणी, मोठी हनुवटी असे "salable items" unmasked. बाकि items हे masked, फक्त नावापुरते !!
म्हणजे म्हणायला identity झाकली आहे पण 'हृतिक आहे' हे समजतेच. खरंतर ते समजायलाच हवंय त्यांना..
"complete masked" नाहीये तो क्रिश !!! mask मधून पण हृतिकच डोकावतो. म्हणजे शेवटी masked असून पण "हृतिक" असण्याचा सोस ..........

"'संत रामदास' यांचे खरे नाव काय ?" किंवा "'बालकवि' यांचे खरे नाव सांगा ?" असे प्रश्न इतके का favorite आहेत ?
जर त्यांना नावाला -आडनावाला जोडलेली पूर्वग्रहदूषित मतं नको असतील म्हणुन तर त्यानी हे मास्क घातले असतील ना ? मग आपण उगाच त्यांची खरी नावं उकरून मग त्याचा सम्बन्ध जात-पात-धर्मं यांच्या बरोबर का लावतो ... Let them live with there identity as writer/saint only !!

जरा out-of-syllabus च झालं हे (मनातलं लिहायला कसला आलाय डोम्बल्याचा syllabus (नाही पण तरीही थोडं विषयांतरच ) ) forget it !

खरं तर आधीपासून असंच ठरलं होतं की "सागर" हाच मास्क वापरायचा... नकोच पब्लिक व्हायला कधी 'खऱ्या मी'  ने...
कळलच तर सागर बद्दल कळावं, पण तरीही कधी मधे "माझा" उल्लेख टाळता नाहीच यायचा.
तसे बघायला गेले तर 'मी' बराच झाकून होतो 'मला'... मस्त freedom मिळतो अश्यावेळी.. लाइट बंद करून किंवा डोळे बंद करून जास्ती मुक्त नाचता येतं ते यामुळेच....
अगदीच शांतता होती- मस्त एकदम ... एखादा दूसरा चुकार कोणीतरी hit करायचा... मी पण मग दरवेळी नित्य-नेमाने ५ वेळा "Next Blog" button दाबायचो.. आणि आवडला एखादा unknown post तर comment टाकुन मोकळा... "To Express yourself is such a relief "
"मिल रहे थे बस हम ही हम " अशी काहीशी feeling पण.... वाटलेलं "शिकलो रे आपन पण मास्क घालून वावरायला, दम कोंडत नाही उलट free वाटतं जास्ती " ..

हा हा हा.... पण हाय रे देवा !! काही चुकार comments यायला लागल्या आणि वर्दळ पण थोडी वाढली...
मग परत कुठून कुठून हिट्स आल्यात याचं कुतूहल ... profile visits count मधे परत गुंतणं ....
anonymous कोण असेल बरं ? आणी XXX कोणीतरी ओळखीची वाटतीये.... कोण आहे केतकी आणि  तिला कसा माहिती "तो" ? २-३ दिवस तिचे ऑफिस-hours waste घालवण्याइतके worth आहे का हे सगळे? असे अनेक प्रश्न आता पडतात ....

म्हणजे स्वतः मास्क घालायचा आणी लोकांच्या मास्कच्या आत कोण लपले याची उत्सुकता...
काय आहे हे ? मास्क मधून मीच डोकावतोय शेवटी ... ना "complete masked" ना "complete unmasked"
की शेवटी masked जगणं जमतं म्हणुन त्यांना "superhero" म्हणतात ??
की शेवटी नुसता मास्क घालायचा सोस ??
शेवटचा पर्याय बरोबर आहे ...

ना धड "बे-जमीं" ना धड "बे-आसमां" असचं झालय.........

No comments: