Pages

Friday, August 14, 2009

श्वास ....

तसं पहिलं तर सगळ्यांचंच आपल्या श्वासाशी काहीतरी नातं असतं rather ते नातं तुटलं किंवा नसेल तर अवघड आहे ....
अगदी लहान असताना आईच्या कुशीत झोपलो की तिच्या श्वासाशी race लावायचो... असे श्वास मोजताना कधी झोप लागायची ते कळायचं पण नाही...
अगदी लयीत चालणारे श्वास कधी मन लावून observe केले तर गुंतून जातो त्यात ... meditation चा एक भाग आहे तो पण.... डोळे बंद करून just श्वास ऐकायचे , शरीराची होणारी हलकी-हलकी हालचाल आणी अगदी स्पर्ष करून जाणारे श्वास ... आपल्याच गतीत धड-धडणारं हृदय... जिवंत असण्याचा अभिमान वाटणारे काही क्षण आणी पुरावे पण कदाचित ....

तर मधे "Tantric" ऐकलं आणी अचानक परत श्वासातलं music कळालं... अगदी शांततेकडून सुरु होणारे काही थोडेच आवाज आणी अगदी थोड्याच मंद हालचाली ... हळु-हळु वाढत जाणारी त्याची लय ... न बोलता समजणारे काही आवाज, आपसुक होणार्या अजुन काही हालचाली ... आणी मग जरा गति पकडली की ऐकू येणारे मंद श्वास ... अगदी लयीत , अगदी हलकेच , अगदी सहज.. इतके सॉफ्ट की कदाचित कोणत्या रागात बांधले तर कोमेजुन जातील श्रुतिंच बंधन पण झेपणार नाही त्यांना ... असेच मुक्त श्वास पण तरीही लय न सुटलेले. आणी मग नाजुक हालचाली बरोबर होणारी बांगड्यांची किण-किण , अतिसूक्ष्म गंध ।
एकमेकांत गुंतलेले श्वास , एकमेकांशी बोलनारे श्वास, एकमेकाना सावरनारे श्वास... अगदी वेग-वेगळे पण करता न येऊ शकणारे... अगदी सगळं शरीरच एक श्वास बनलय की दोन्ही शरीर एकच श्वास बनलय असा भ्रम ? दोन शरीरातून एकच धुन निघावी, अगदी एकच सुर... श्वासांचं इतकं एकात्म !! आणी कितेक वेळ या संगीतावर झुलनारे देह ..सगळं काही लयीत ..... आणी मग निवलं सगळं की मग हे श्वासांचं संगीत पण विरत जावं ... शांततेकडून शांततेकडं परत ...........


च्यायला... असं अगदी erotic पणाच्या लिमिट ला टेकतो कधी कधी. इतका की माझ्या Virginity वर शंका यावी ....
पण चालायचंच हे वयच असं असतं ... असं नको वाटायला नंतर "अरे हे श्वास कधी एकलेच नाहीत " .....

No comments: