Pages

Wednesday, January 7, 2009

Being Typical !

...ऑफिसात काहिना-काही काम काढून Late थांबण्यापेक्षा काम bunk करून तुला Sunset च्या वेळी भेटायला लवकर निघावं ऑफिस मधून आणि सुर्यानंपण काहिना-काही काम काढून Late डुबावं...
...मला पण वाटतं हाताला घट्टे पड़े पर्यंत drive करण्या पेक्षा तुझ्या बरोबर गिरणीतून दळण आणायला जावं , चालत , हातात हात घेउन पुढच्याच चौकातुन ...
...late night blog वर काहिना -काही लिहिण्या पेक्षा तुझ्या पाठीवर बोटांनी मनातलं काही लिहावं अणि तू ते ओळखावं
...racism, गरीबी , विषमता etc च्या गप्पा चघळत बसण्यापेक्षा CCD च्या coffee चे dose घेत खिडक्यांच्या पडद्याचा रंग matching हवा की contrast हवा हे ठरवत बसलो असतो ...
...मला पण वाटतं New Testament and Quaran यातील साम्य स्थळं शोधन्यापेक्षा विवेकला मराठी meduim मधे घालायचं की english medium मधे याचं discussion करावं ...
...पुराणातल्या examples च्या मागचं logic शोधन्यापेक्षा मुक्ताचं 'mental maths' चे examples सोडवून द्यावेत ...
...Theatre मधे camera angles, character portrayal, scene balance शोधन्यापेक्षा अंधारात तुझ्या केसांच्या मंद सुवासात कानामाधे angle, curves and posiotions बद्दल काहीतरी सांगावं ..
...वाढ्त जाणारी काळी वर्तुळं मोजन्यापेक्षा संधिवाताच्या तुझ्या गोळयांचे Dose मोजत बसलो असतो स्वताचे गुडघे चोळत ...
...गप्प राहून घुम्यासारखा विचार करत राहाण्यापेक्षा मस्त 'heyy gang..' म्हणुन mails forward करत , frends लोकं भेटली की मस्त मीठी मारून टाळ्या देत gossip करत , cousines बरोबर कोणाला तरी छेड़त रहावं असं मला पण वाटतं ....
...एकटं राहून गर्दीचं गर्दीपण बघण्यापेक्षा गर्दीचं होउन तिच्या सारखंच नाचून बघावं कोणी बघत नाही असं समजुन ...
पण ...पण हे शक्य नव्हतं ... Being Typical होणं मस्त होतं ... होइल कदाचित कोण जाणे .......

1 comment:

Onkar said...

आज काल चांगला लिहायला लागला आहेस ! असाच लिहित जा, वाचावास वाटेल नंतर पण ...