आधी तुला बघायचो मग स्वर कळायचे मला. स्वरांची पहिली ओळख कानाआधी डोळ्यांनीच करून दिली. तुझ्या चेहऱ्यावरचे हाव-भाव वाचूनच तर रागदारी कळाली मला.
आपल्या खटल्याच्या घरात कुठला आलाय एकांत ? त्यामुळे तुझ्याजवळ राहण्याची संधी म्हणून बासष्ठचा सवाई अजून आठवतो मला. हिवाळ्याच्या ४-५ दिवसात तुझ्या बरोबर काढलेले कित्येक तास आणि शिवाय संगीत जोडीला.
आपला पहिला सवाई. गर्दीत बुजलेली तू , तानपुरयाचे पहिले स्वर ऐकताच स्तब्ध झालीस. तानपुरा लागे पर्यंत तुझे काळेभोर, आसुसलेले डोळे स्वरमंच शोधात राहिलेले आणि मग हिराबाईंचा षडज लागला. त्याच क्षणी तू डोळे हलकेच मिटलेस..... कदाचित दुसर्या कोणत्याच sense ने कानाला मिळणारा आनंद biased होऊ नये म्हणून visual sense तू बंद केलास. 'दीर्घ "कश" घेताना डोळे आपोआप का मिटतात ?' या नुकत्याच पडलेल्या कोड्याचे पण मला उत्तर त्यावेळी मिळालेले. अगदी स्वर न स्वर तू साठवत होतीस आणि तुझ्या चेहऱ्यावर तो आनंद ओसंडून वाहत होता. अजूनही षडज लागल्यावर तुझेच डोळे आधी दिसतात नंतर तो कानांना समजतो...
मग प्रत्येक तानेला होणारी तुझी भुवयांची हालचाल, हरकती ऐकताना तुझ्या नाजूक ओठांची थरथर आणि समेवर येताना मानेला दिलेले हलकेसे झटके. कितेक वेळ मग सगळा 'तिलक कामोद' मला तुझ्या चेहऱ्यावर दिसत होता, समजत होता.
संगीतातला ओ कि ठो काळात नव्हता त्या वेळी पण काहीतरी नवीनच अनुभवत होतो मी. ती तुझ्या सौंदर्याची अनुभूती होती कि संगीताची हे अजूनही सांगता येणार नाही. पण त्या वेळेपासून नवीच दिसलीस तू मला, नितांत सुंदर.
तुझ्या सोबतीत आजूबाजूचं संगीत पण नव्यानेच ऐकू यायला लागलं होतं.
आणि मग मला ते वेडच लागलं - तुला ऐकताना बघायचं !
आलापी ऐकताना पापण्यांची होणारी मंद थरथर अगदी डोळ्यांच्या आजूबाजूला सुरकुत्या आल्या तरी तशीच हवीहवीशी वाटायची मला.
तबल्याच्या तालांना आपल्या नाजूक पावलांनी ठेका द्यायचीस. मऊशार पावलं आणि ती पैंजणं . विलंबित त्रितालात लोकांना तबला ऐकू यायचा आणि मला तुझ्या पावलांच्या ठेक्याने वाजणारी पैजणे. नंतर पावलं भेगाळली तरी तबल्याची साथ अजून तशीच होती...आणि मला ऐकू येणारी ती पैंजणांची छुमछुम पण...
अतिशय अवघड ताण घेताना आपसूक तुझाही हात वर जायचा. हिरव्याकंच नऊवारी मधून तो गोरापान हात बाहेर यायचा आणि त्या हातांमधल्या त्या गडद हिरव्या बांगड्या. नेहमी पदराआड लपलेले ते सोंदर्य अशावेळी नकळत बाहेर यायचे. लोकं त्या अचूक तानेच्या/जागेच्या सोंदर्यसाठी "वाह !!!!" म्हणायचे अन माझ्या हि तोंडून "त्या" जागेसाठी "वाह !" निघून जायचे. मीही मग अश्या अवघड तानांची वाट पाहत बसायचो. अजूनहि पाहतोय.
मैफिल संपली कि भानावर यायचीस तू, पदर वगैरे नीट करून सावरायाचीस. मग संपला दिवस कि नदी काठावरून घरी जाताना एरवी अबोल असणारा मोगरा फुलून यायचा. किती सांगू किती नको असं होऊन जायचं तुला. अगदी सगळ्या जागा, सगळे राग, बंदिशी त्या हिवाळ्याच्या थंडीतच समजल्या मला.
'सवाई' 'थंडी' शिवाय रंगत नाही म्हणे पण आपली 'थंडी' 'सवाई' शिवाय रंगायची नाही. भारावलेले दिवस ते.
हळूहळू मग माझ्या भावनांना, वेळा-काळाला, प्रहारांना राग समजत गेले. त्याहून महत्वाचे म्हणजे मला "तू" समजत गेलीस....
मैफिलीच्या सर्वोच्य क्षणी शहारून तू डोळे उघडयाचीस, मला शोधायला. तो क्षण तुला माझ्या बरोबर share करायचा असायचा. तुझे ते पाणीदार डोळे बघून माझ्याही अंगभर शहारा फुललेला. मग कळायचं नाही हा शहारा त्या उत्कुष्ट संगीताचा असायचा कि तुझ्या नजरेचा. असे कित्येक क्षण एकत्र जगलेलो, एकत्र शहारलेलो. संगीतामुळे शहारा आला कि शहारलेली, डोळ्यात थोडेसे पाणी आलेली तू दिसतेस. गेल्या चाळीस वर्षात असे कित्येक क्षण सवाई ने दिले....
आणि आता....
माझा चाळीसावा सवाई ! पण तुझ्याशिवाय पहिलाच !!
पण या वेळी स्वरांची कसोटी आहे. ते सगळे स्वर 'ऐकताना' तू 'दिसायला' हवियेस आता मला....
माझा चाळीसावा सवाई ! पण तुझ्याशिवाय पहिलाच !!
पण या वेळी स्वरांची कसोटी आहे. ते सगळे स्वर 'ऐकताना' तू 'दिसायला' हवियेस आता मला....
9 comments:
1. i dont't want to spoil the post. so added this in comment.
2. कश = चुंबन .... so (for a change) this post is complete Veg. but comment part is not :D
3. i never want to explain about the title. if u feel the post then u'll get the meaning of the title.
4. however, i know माझ्या ब्लॉगचे readers किती "मंद" आहेत ते. म्हणून यावेळी title जरा explain करतो.
5. तसं पाहायला गेला तर मला पण "सम" म्हणजे काय ते technically माहिती नाहीये. तरीही ....माझ्या definition नुसार explain करतो ..
---
हा post सुरु होतो "तू दिसलीस आणि मग स्वर कळले."
visual sense to hearing sense.
आणि मग काही अनवट जागा, हरकती , अनुभव , प्रसंग मांडलेत post च्या मध्यात.
त्यात स्वर आणि 'तू' यांच्यातला संबंध दाखवला आहे. Visual and hearing senses मधला संबंध !
काही जागा जमल्यात, काही नाही. थोडे जरा लांब आलाप आहेत. आणि मग हे सगळं होऊन शेवटी
परत "स्वर ऐकू येणारेत यावेळी पण त्यांनी तू दिसायला हवियेस."
Hearing sense to Visual.
अशा "समेवर" हा post येऊन संपतो.
----
अशी बंदिश मांडण्याचा प्रयत्न होता. संगीतातला ओ-कि-ठो कळत नाही मला, त्यामुळे मैफिल न-रंगण्याचे chances जास्ती आहेत.
तरी try आपला. Bathroom-singer म्हणून सोडून द्यायचं.......
"Bathroom Singer" ची मैफिल फसलेली आहे :D
"सम"चा अर्थ वेगळाच असतो .... (असं technical review नंतर कळलंय )
so please ignore the explanation of title. and read new title as -
"बंदिश", "बासष्ट", "(Bathroom Singer ची) मैफिल" किंवा "तानपुरा/स्वर-मंडल" किंवा अगदीच fancy पाहिजे असेल तर "सात स्वरांचे इंद्र धनुष्य"
असो...
technically kaahihi aso, pan "समेवर..." hech title yogya vattay
aani ho मैफिल changlich ranglie :)
keep it up
अरे नाही ! फसलेला वगैरे काही नाहीये ! 'सम' किंवा 'मात्रा' यापैकी काहीही चाललं असतं...
SAM –
सम is the first taali. It is also the most accentuated beat. सम also is the starting point as well as the ending point of theTaala cycle. The sign for Sam is +
MAATRA –
Taala is cyclic in nature. Each Taala has a fixed number of beats called matras. Thus, matras form the smallest unit of the Taala.
परंतु 'समेवर' हे शीर्षक लक्षवेधी (catchy)आहे आणि समर्पक देखील आहे
superb..simply superb !! Too good ! I'm awestruck !! This is a beauty, from the start to the end..n the end is the zenith ! WOW !
There could not have been a more apt title for this..n it's a kind of a title which I like..short, expressive, but not very obvious..
and I think, the jargon used is fine..At no place does it really depend on the technicalities of the classical music per say..so, it's fine..(I don't know much about these terms in depth, either..but they look fine..).
and the title and the explanation that goes with that is absolutely perfect...no scope for betterment there..
I don't think this cud have gotten any better from the literary perspective..but as far as the technicalities are concerned, I'l try to see if there cud be a use of jargon which is more fitting...(but, i really don't see the need to do so)..
Very well done !!Genius !
ठुमरीची रंगत त्या मज न कले पण सोपी !
मानेतिल मुरकी अन डोळ्यातील आलापी !!
अप्रतीम !
Khup sundar lihilays...
mala pan sangitatla O ko Tho kalat nahi .... pan hya article madhlya bhawana nakki kalalya... mehfil rangilye... ata thoda far ekada tikada 'Chalaychach' :)
(खूप दिवसांनी ) असे छान comments ऐकले की कसं वाटतं ?
.................... असं ............ !!!
( "तू" मधली एक मस्त कविता आहे ही)
Guess what ?
हा पोस्ट सुचला तेव्हा सितार होती बरोबर ....
http://sawaigandharvasangeetmahotsav.com/programmeon9.html
शाहीद परवेझ आणि सितार :D आणि शहार्यांचा वर्षाव ....
Post a Comment