Pages

Thursday, May 7, 2009

NameSake

असं मुंगी नकळत चिरडली जावी तसं वाटलं मला ..

another shit of my so-called 'selfmade-ness' (i even don't know is 'it' a word or not).its about the person from whom i got my name. its not like "gogol", as this one is chosen by me, myself. मीच माझं नाव "ते" ठेवलं होतं
There was a boy, around 2 yrs older than me. शेजारच्या वाड्यात खेळायला यायचा. मी अगदी लहान असताना, ३ -४ वर्षाचाच असेल. त्याची आत्या का काकू त्याला सारखी हाका मारायची "अमोल ,अमोल ... अमोल ..." म्हणुन... मला ते नाव खुप आवडलेलं, जेव्हा शाळेत नाव घालायचं होतं तेव्हा १ खुप hard नाव होतं - धैर्यशील so ते बाद झालं. आणी जे सागर नाव होतं ,petname, ते खुप simple वाटायला लागलं एकदमच PET. मग मीच सांगितलं म्हणे- मला "अमोल" म्हणा - म्हणुन. so अमोल हे नाव लागलं पटावर. त्या शेजारच्या मुलाचं नाव होतं अमोल मुपिड !!

नंतर खुप वर्षांनी त्याचा फ़ोन आलेला मला. NTS, SSC board, KVPY च्या success मुळं सगळीकडं नाव झालं होतं माझं (once upon a time) so एका हुशार मुलाला नगर सारख्या ठिकाणी चांगला guidance मिळावा म्हणुन त्याने फ़ोन केलेला. नंतर भेटलो आम्ही. family relations पण चांगले होते. त्याने IIT साठी खुप motivate केलं होतं. डोक्यात जरा हवा गेली होती so i failed there... but the thing i remember @ him is his hard work . घरी गेलेलो त्यांच्या तर तो नव्हता, नंतर साइकिल वरून आला. काळा, धष्टपुष्ट, spects आणी bag-भरून books घेउन. even त्याचे घर पण same आमच्या सारखेच होते, बाहेरून plaster नाही just बांधलेलं, incomplete बंगला,आत furniture etc काही नाही. just त्याचे study table अणि आजुबाजुला पडलेली खुपसारी books. खुप म्हणजे खुपच books.प्रचंड studious मुलगा होता तो. कधीच TP केलेला बघितला नाही मी त्याला. एकदम determined for IIT.अणि त्याने मिळावली admission IIT मधे. नगर मधून दुसराच असेल i think IIT मधे जाणारा तो. खुप भारी होता तो. खुप मेहनत पण घेतली होती त्याने. real hardworker, अणि खुप sacrifices पण केले होते. त्याने पण अणि त्याच्या parents ने पण.
मुलाला distrub नको म्हणून सगळे relations पण तोडले होते त्यांनी. even कोणाला घरी पण नाही बोलवायच्या. अशी अलिप्त होती family ती. केवळ अमोल हाच १ त्यांचा aim होता, त्यांचे future , त्यांचे सर्वस्व. एकुलता १ होता अणि खुप हुशार.so खुप proud होता त्यांना त्याचा पण मला त्यानी हुन guidance केलं याचं खुप विशेष वाटलेलं. खुपच dedicated मानसं होती ती.
even त्याचे पापा पण.IIT चे forms Canada Bank मधे मिळायचे पुण्यात. so ते कुठं मिळतिल याचा त्यांनी address सांगितलेला - "दगडुशेठच्या मंदिराकड़ं तोंड करून left ला 200 पावलं चाललात की आलीच Canada Bank." हे 200 पावलांचे गणित एइकुन मला खुप मजा वाटलेली. खरच लोकं पावलं मोजतात का चालताना ? पण ते खरा होतं details होते त्यांच्या कड़े सगळे. IIT cut-offs ची ,colleges ची , courses ची, books, classes ची details त्यांना माहित होते. असो !!!

नंतर तो IIT मद्रास हून शिकला. नंतर माझा पण contact गेला त्याच्याशी. मी IIT त fail होउन typical track पकडला होता so त्याने नाद सोडला असेल माझा. पण त्याचे पापा नेहमी चौकशी करायचे माझी वडीलांकडं. नंतर शिकून US ला गेला एका चांगल्या companit कामाला होता. त्याच्या rather त्यांच्या hardwork ला यश आलं होतं. इतके दिवस पाहिलेले स्वप्न
खरं झालं होतं. तो successful होता आता....

अणि काल संकेतने सांगितले- तो US मधेच एका road-side accident मधे गेला...
shit....डोकं सुन्न झालं होतं एकदम. मी त्याला परत विचारलं अमोल मुपिड ?? do u know him ? परत crosscheck केलं की तोच तो का ? तोच तो नको होता मला.....
पण तो तोच होता.... अणि मला मग हे सगळं आठवलं...1-1 details...

मुंगी चिरडली जावी असं वाटलं...अरे इतके efforts, इतकं hard-work, इतके dreams, इतकी sacrifices, अणि त्यांचा end असा ?? shit कसलं क्रूर आहे हे सगळं !! death इतकी स्वस्त झालिये ?? अणि त्याचीच का व्ह्यावी ? बाकि कोणी पण न -effort केलेला मरायला हवा होता. काय value आहे इतकं जगलेल्याला ? सगळे thoughts,हट्ट, अभिमान, स्वप्न या काहीच matter करत नाहीत मरायचं ठरवताना ?? shit 'पत्त्याचा बंगला' वाटतय मला हे सगळं. मनोरे रचायचे- carefully, concentration ने, 1-1 मजला चढवायचा अणि नंतर खाउन-खाउन फुगलेल्या देवाने हळूच पादावं अणि सगळं फुस्स. सगळा बंगला कोसळावा ..
खुप वाईट आहे राव हे, अगदी क्रूर आहे सगळं !

दुसर्या दिवशी अंघोळ करताना पण हेच डोक्यात होतं. अंघोळ समप्ली अणि उरलेलं पानी सवयीने सगळीकडं शिंपडले अणि "गुरुर ब्रम्हा...." पुटपुटु लागलो अनाहुतपणे.मग अचानक लक्षात आलं अरे हे काय केला मी ? कधीच सोडून दिलं होतं ना हे सगळं ??देव-देव, मंत्र-तंत्र etc.
देवाला आपण "भक्ति" पेक्षा "भीतीने" जास्ती मानतो. त्याच भीतीमुळे मी sub-consciously देवाला नमस्कार करायला लागलो होतो. बरं झालं एइन वेळी आवरलं स्वतहाला, मंत्र बंद केले
"अमोल, लढला आहेस तू खुप. आता या देवाने घाण प्रकारे "Cheat-Code" वापरून मारले आहे तुला. तू भारी आहेस देवापेक्षाही "

अगदी मुंगी चिरडल्या सारखं वाटतयं.

........एका अमोलचा दुसर्या अमोलवर लिहिलेला मृत्युलेख....

2 comments:

Ketaki Akade said...

Agdi asach vatlela.. I knew Amol too.

sagar said...

कधीकधी तसा काही "contact" नसताना पण काहीतरी जुळलेलंच राहतं, अणि मग "कुण्या काळचे पाणी ....