Pages

Saturday, May 30, 2009

आम्ही !

प्रतिभा असणार्या लोकांचं बरं अस्तं ...
नकळत एखाद्या क्षणी ..उड्नारी म्हातारी हळूच येउन गालावर बसावी , आपल्या मऊ-मऊ, पांढर्या केसांनी गुदगुल्या कराव्या.... तसे हळुवार शब्द येतात ...आपण होउन सांड्तात पानांवर...
किंवा...
नकळत एखाद्या क्षणी .. फुलपाखरू बसावं शांत ठेवलेल्या ब्रशवर आणी जाताना रंग सोडून जावं त्यानं. ते रंगपण मग आपल्या-आपणच combination आणी position ठरवूनआल्यासारखे पसरावेत कैनवासवर ..
किंवा...
नकळत एखाद्या क्षणी ..मंद झुळुक यावी आणी हलकेच स्पर्शुन जावी केसांना. ती हलकेच हलणारी केसांची बट , जणू सितार छेडलिये कोणीतरी...हळुवार बोटं फिरावी तारांवरुन आणी शहार्या सारखे तरंग उमटावेत आवाजाचे..

मस्त व्यक्त होतात ते ......

नाहीतर 'आम्ही' प्रतिभा नसलेले ..
ठरवलेल्या ठिकाणी वाण्याचे 'Computerized Bill' पण परत tally करून घेतो...'हळुवार' चुक झाली computer ची तर ?
पावसाचा टपोरा थेम्ब पडला हातावर तर आधी Raincoat कडं हात जातो .. शहारे येउन वर्षं लोटली आता..
2 पानांचा महिन्याचा हिशोब सांभाळता-सांभाळता कितीतरी क्षण , दिवस उडून जातात ....हातात चुकलेले हिशोब सोडून...
........
आणी मग 'आम्ही' घरी येतो दमून-भागुन , कसाबसा दिवस क्षितिजापार ढकलून ..... आणी मग या प्रतिभा असणार्या लोकांच्या प्रतिभेचे कौतुक करत बसतो ..
तसं बरं अस्तं प्रतिभा नसलेल्या लोकांचं पण.

No comments: