....Even the worst thing with life is, it doesn't have background music .. :D ...
When u leave someone on bus station...already late झालेली bus अजुन late व्हावी असं वाटत असतं . उलटी वाल्या dirty window मधून नजरा- नजर होती ..अणि काही न बोलता गाड़ी सुटते..अन्तर वाढत असतं पण काहीच music वाजत नाही background la.. not even some violin notes...शेवटच्या भेटीत जड़ पायाने Pizza Hut च्या बाहेर पडताना ...दोघांचे हात नकळत Bell कडं जातात .."We had a great time" ....Bell वाजते पण ..काहीच music वाजत नाही राव background ला... not even some चुकार fingers on piano...
first ever performance in school gathering देऊन येणार्या daughter ची वाट पाहत असतो आपन theatre च्या मागे ..कधी एकदा भेटतो असं झालेलं असतं ...अणि ती पळत पळत येउन चिकटते ...तिच्या बडबडीचा आणी पप्यांचा आवाज येतो ... पण ..slowmotion मधे ती येउन चिकटताना काहीच music वाजत नाही यार background ला ...not even some उड़ती tune on casino ...
हजारवेळा ceiling fan ची पाती मोजत बसलेला असतो - छप्पर वाचत नाहीतर... change नाही होत count कधीच. boring थंड evening ला कोणीच bachground ला music का वाजवत नाही ...not a single sad tune...
exam चा question paper दिलेला असतो ,फोडू नका सांगतात ....ते 10 min कधी एकदा जाउन paper लिहायला सुरु करू झालेलं असतं ... परिक्षे आधीचे टेंशन-भरे 10 min...कोणी music का नाही वाजवत मधल्या वेळेत ..ते typical "tic-tic" of clock atleast....
समुद्राच्या आवाजानेच जाग यावी....bed खाली पाय टाकला तर लगेच पायाला समुद्राची वाळु लागावी...आणी समोर सारं निळं-निळं .. कोणी वाजवत का नाही एखादी sunny tune या वेळी ....
किंवा आपल्या श्वासांच्या गतित चालणारी समुद्राची गाज (or vice a versa) आणी हळूच मऊ मऊ वाळु पायाखालून हलावी ...आणी हळूच घट्ट होणारी तिच्या हाताची पकड़ ....या क्षणी कोणी guitar वाजवेल का ...
tension मधे lift मधून जात असावं ..कोणाच्यातरी headfones मधून मस्त शांत सतार वाजवी ...tension free 3 floors जावेत ....
आजीच्या मऊशार कुशीत झोपलेलो असताना दूरवर एखादा अभंग का वाजू नये? किंवा तिचे हात केसातून फिरताना कोणी वीणा का छेडू नये ?
अगदी impulse मधे climax पर्यंत गेलेलो असावं , अगदी शेवटचा थर-थरनारा क्षण पण दोघानी मिळुनच पकडलेला असावा -अगदी एकदमच दोघांनी 'सम' गाठलेली असावी . अगदी अर्ध्या श्वासाच्या अंतरावरचे दोन विस्कटलेले देह .... आणी नंतर हळुहळु श्वासांचे भाते शांत होइतो, परत एकाचे दोन देह होइतो, पापण्यांना जाणवनारे उष्ण श्वास थंड होइतो - घामेजल्या तळहातान्ना हातात घेउन त्यावरच्या रेषांमधे निशब्द काही शोधताना कोणी मागे मंद music लावेल का ? स्वप्नाच्या हलक्याशा धक्क्याने थरथरणार्र्या पापणीच्या हालचाली इतके मंद .... दिवसभर रेंगाळनार्र्या तिच्या गंधा इतके मंद... pour some music yaar..
किंवा
office सुटल्यावर bike वर निघावं परत त्या boring life कडं... कानात silent invocation A or B लागलेलं असावं, अगदी वेगळ्या विश्वात, bike पेक्षा त्या स्वरांवरच स्वार झालेलो असावं.... मंद.. शांत.. पूर्ण...pure वाट्ण्याचे काही क्षण..अगदी सगळं विसरायला लावणारी बासरीची धून...आणी मग धाड़-धडाम. लोकांची गड़बड़, बधिर झालेले शरीर, लांबून दिसणारा ambulance चा दिवा ...... हळुहळु विरत जाणारे श्वास आणी विरत जाणारी बासरीची ती धून ................................अगदी या क्षणी पण please pour some music.........
Please Pour Some Music ....................
1 comment:
Understabdable it flows wasily when you let it come out but dude, dont be lazy...type marathi in devnagri font consistently..
Post a Comment