Pages

Saturday, June 14, 2008

Have u bought Gajra lately ??

तुम्ही कधी घेतला का हो गजरा कुणाला ??
शेजारणीला नाही म्हणत मी पण atleast तुमच्या GF ला or बायको ला ??
अगदी अबोलीचा नाही तर atleast मोगऱ्याचा ?
signal ला विकतात ना काही मूलं, त्यांच्याकडून ......... at least 90 sec च्या boring waiting ला जरा सुगंधी करणारा गजरा !
मी नाही पाहीले अजुनपर्यंत कोणाला गजरा घेताना .. खरच नाही ... रात्री उशीरा पण त्यांच्या हातात 10-15 गजरयांच्या माळा असतातच. कधी त्यांना रिकाम्या हाताने जाताना नाही बघितले मी .. पण अजुन कोणी विकणेही बंद नाही केले. याचा अर्थ कोणीतरी घेतयं ...बरं आहे ... मला दिसायला हवा कोणीतरी ..तेव्हडच मला बरं वाटेल
..अरे हो कोण बरं- अगदीच low नाही तर mid waist jeans and short top वर गजरा घालेल ? or गेला बाजार केसांची मस्त hair style करून त्यावरुन गजरा कोण माळणार ? हॉटेलमधे किती awkward वाटेल ते ... परत scent चा वास बुजायचा उगाच ....नकोच त्यापेक्षा ..
Do u know ?...आपल्या generation च्या कितीतरी लोकांच्या birthday च्या 9 months आधी कोणातरी फुलवाल्याचा गजरा विकला गेला असेल ते !!! नाही समजले ??
अरे खटल्याच्या कुटुंबामधे वाढताना एकमेकांचा स्पर्श जरी झाला तरी शहारे येणाऱ्या त्या पिढीचा गजरा हा किती मोठा messenger होता ते माहितीये का ?
आता medical store मधे एकमताने dotted/ribbed/flavored ची choice करणाऱ्या couples ला काय माहीत .. की ज्यांचा romance हा घरच्यांच्या आणि स्वःताच्या झोपेच्या अर्धा-एक तासाच्या difference वर चालायचा त्यांना गजरा हा मेघदूताप्रमाणे वाटत असेल ..
असो... दोष नाहीये कुणाचा . गजरा घेणे - नाही घेणे यात romantic पना चा काही सम्बन्ध नाही. आणि येणाऱ्या पिढीचा दोष-बीश तर अजिबात नाही ..
पण जरा कधी जुने movies बघतो or कधी जुन्या fashion चे कपडे घालतो तसे गजरा घ्या कधीतरी ..बघा जुन्या प्रेमाचा वास येतो का त्याच्यात .

No comments: