Pages

Saturday, May 30, 2009

आम्ही !

प्रतिभा असणार्या लोकांचं बरं अस्तं ...
नकळत एखाद्या क्षणी ..उड्नारी म्हातारी हळूच येउन गालावर बसावी , आपल्या मऊ-मऊ, पांढर्या केसांनी गुदगुल्या कराव्या.... तसे हळुवार शब्द येतात ...आपण होउन सांड्तात पानांवर...
किंवा...
नकळत एखाद्या क्षणी .. फुलपाखरू बसावं शांत ठेवलेल्या ब्रशवर आणी जाताना रंग सोडून जावं त्यानं. ते रंगपण मग आपल्या-आपणच combination आणी position ठरवूनआल्यासारखे पसरावेत कैनवासवर ..
किंवा...
नकळत एखाद्या क्षणी ..मंद झुळुक यावी आणी हलकेच स्पर्शुन जावी केसांना. ती हलकेच हलणारी केसांची बट , जणू सितार छेडलिये कोणीतरी...हळुवार बोटं फिरावी तारांवरुन आणी शहार्या सारखे तरंग उमटावेत आवाजाचे..

मस्त व्यक्त होतात ते ......

नाहीतर 'आम्ही' प्रतिभा नसलेले ..
ठरवलेल्या ठिकाणी वाण्याचे 'Computerized Bill' पण परत tally करून घेतो...'हळुवार' चुक झाली computer ची तर ?
पावसाचा टपोरा थेम्ब पडला हातावर तर आधी Raincoat कडं हात जातो .. शहारे येउन वर्षं लोटली आता..
2 पानांचा महिन्याचा हिशोब सांभाळता-सांभाळता कितीतरी क्षण , दिवस उडून जातात ....हातात चुकलेले हिशोब सोडून...
........
आणी मग 'आम्ही' घरी येतो दमून-भागुन , कसाबसा दिवस क्षितिजापार ढकलून ..... आणी मग या प्रतिभा असणार्या लोकांच्या प्रतिभेचे कौतुक करत बसतो ..
तसं बरं अस्तं प्रतिभा नसलेल्या लोकांचं पण.

Thursday, May 28, 2009

समांतर

दरवेळी वाटतं येणारा पाउस यावेळी तरी एकटेपणा घालवेल आपला. हजारो-लाखो धारा घेउन येणारा पाउस, यावेळी एकतरी धार आपली असेल, माझी असेल. बेधुंद कोसळताना एकतरी सर, एखादी चुकार धार विचारपूस करेल. atleast impulse मधे जोरदार कोसळन्याचा अनुभव expressively सांगेल. काही क्षण तरी दुकटं करून जाईल. पण कसला विरोधाभास आहे हा. या हजारो धारा -टिपिकल भाषेत सहस्त्र-धारा म्हणा- आभाळातुन कोसळतात. खुप distance traverse करतात. पण शेवटी प्रत्येक धार एकटी असते, एकमेकांपासून अलिप्त. एकमेकिंबरोबर पडतात पण एकमेकींना समांतर. स्पर्षपण नाही करत पडताना दुसरीला. अगदी शिष्ट, एकट्या, स्वताच्या धुंदीत कोसळतात. आता या अशा एकट्या, अलिप्त, शिष्ट धारांकडून काय अपेक्षा करणार एकटेपणा घालावयाची ??

असा हा येतो अणि अजुनच एकटं करून जातो.... नेहमिचच झालय हे..

Tuesday, May 19, 2009

Crash Course

मौली गांगुली सांगते अजय देवगनला "आज 2 बाते सिखाई १ दिन में 1 : रोते समय shower ON करना और नींद की गोली हमेशा साथ रखना"

some more tips from my side now ..doing 15 days of "crash course" so just sharing some tips :

Day 1: Cigs make it very easy to delete "hard to delete sms". Its really very easy to push delete with our left hand's fingers when stick is burning in your right hand. even कृष्णाला पण आपली "बासरी" right हातात असताना राधेचे sms delete करनं सोपं झालं असेल. म्हनुनच ciggy ला लाडाने बासरी पण म्हणतात.

Day2: Never read the sms that u want to delete.just (Step 1) select the person specific sms -> (Step 2) one click "option" -> (Step 3) another click "delete" as simple as this.. but never read that msg again. if u spen time reading the msg in Step 1 u will never go to Step 2. basic fones really help here -low memory, less steps to delete.lesser the step easier the deletion.. And yes one more thing. Dony try to delete fone numebr. It wont help. U will never forget it.

Day3: "Music is in air" and "Smoke is in air"... is it just a similarity ?? it is the best combination in the world. They together make such a amazing "duet".

Day 4: its very good habit to brush your teeth twice, in my case before sleep. Even after Giving up, continue with this habit.but do remember to brush ur lips too. They are prone to become black. Brush your teeth as many time as u can but do remember to jave a good hand/finger on ur lips too. Remember thr is no one to clean ur lips :)

Day5: "Pressure" येण is not a myth. It is fact! i never believed in it but i agree...

Day 6: smoke after u r DONE. Another best combination, but not together. follow the chronology. DO IT first and then light it. jus amazing..

Day 7: देवघरातली काडेपेटी परत देवघरात ठेवा. Terrace मधे काडेपेटी could cause many questions. लोकांना शक नाही येत. better keep it where it was before.

To Be Continue..........

No Smoking !!

Then someone asked me "so इतक्या गोष्टी तू सोडल्यास काही गोष्टी धरल्या का नाही ?? just सोडून देणं सोप्पं आहे भो काहीतरी गोष्टी सुरु करायचं resolution केलं का नाही ??"
"ohhh....i never thought of that...how did i forget that॥have to think upon this..."

so ?? कशाची सुरुवात करावी ?? 2-3 सवयी सोडल्या आता कोणती धरावी ? आता काही गोष्टी विचार न करता "give-up" केल्या आता काय बरं विचार करुन "start" करावं ?? or vice-versa ?? :D

अनुराग said in one of his interviews..."In fact i fooled Censor Board.. No smoking is not at all 'anti-smoking'..rather it is 'pro-smoking'

so do this post :D

Thursday, May 7, 2009

NameSake

असं मुंगी नकळत चिरडली जावी तसं वाटलं मला ..

another shit of my so-called 'selfmade-ness' (i even don't know is 'it' a word or not).its about the person from whom i got my name. its not like "gogol", as this one is chosen by me, myself. मीच माझं नाव "ते" ठेवलं होतं
There was a boy, around 2 yrs older than me. शेजारच्या वाड्यात खेळायला यायचा. मी अगदी लहान असताना, ३ -४ वर्षाचाच असेल. त्याची आत्या का काकू त्याला सारखी हाका मारायची "अमोल ,अमोल ... अमोल ..." म्हणुन... मला ते नाव खुप आवडलेलं, जेव्हा शाळेत नाव घालायचं होतं तेव्हा १ खुप hard नाव होतं - धैर्यशील so ते बाद झालं. आणी जे सागर नाव होतं ,petname, ते खुप simple वाटायला लागलं एकदमच PET. मग मीच सांगितलं म्हणे- मला "अमोल" म्हणा - म्हणुन. so अमोल हे नाव लागलं पटावर. त्या शेजारच्या मुलाचं नाव होतं अमोल मुपिड !!

नंतर खुप वर्षांनी त्याचा फ़ोन आलेला मला. NTS, SSC board, KVPY च्या success मुळं सगळीकडं नाव झालं होतं माझं (once upon a time) so एका हुशार मुलाला नगर सारख्या ठिकाणी चांगला guidance मिळावा म्हणुन त्याने फ़ोन केलेला. नंतर भेटलो आम्ही. family relations पण चांगले होते. त्याने IIT साठी खुप motivate केलं होतं. डोक्यात जरा हवा गेली होती so i failed there... but the thing i remember @ him is his hard work . घरी गेलेलो त्यांच्या तर तो नव्हता, नंतर साइकिल वरून आला. काळा, धष्टपुष्ट, spects आणी bag-भरून books घेउन. even त्याचे घर पण same आमच्या सारखेच होते, बाहेरून plaster नाही just बांधलेलं, incomplete बंगला,आत furniture etc काही नाही. just त्याचे study table अणि आजुबाजुला पडलेली खुपसारी books. खुप म्हणजे खुपच books.प्रचंड studious मुलगा होता तो. कधीच TP केलेला बघितला नाही मी त्याला. एकदम determined for IIT.अणि त्याने मिळावली admission IIT मधे. नगर मधून दुसराच असेल i think IIT मधे जाणारा तो. खुप भारी होता तो. खुप मेहनत पण घेतली होती त्याने. real hardworker, अणि खुप sacrifices पण केले होते. त्याने पण अणि त्याच्या parents ने पण.
मुलाला distrub नको म्हणून सगळे relations पण तोडले होते त्यांनी. even कोणाला घरी पण नाही बोलवायच्या. अशी अलिप्त होती family ती. केवळ अमोल हाच १ त्यांचा aim होता, त्यांचे future , त्यांचे सर्वस्व. एकुलता १ होता अणि खुप हुशार.so खुप proud होता त्यांना त्याचा पण मला त्यानी हुन guidance केलं याचं खुप विशेष वाटलेलं. खुपच dedicated मानसं होती ती.
even त्याचे पापा पण.IIT चे forms Canada Bank मधे मिळायचे पुण्यात. so ते कुठं मिळतिल याचा त्यांनी address सांगितलेला - "दगडुशेठच्या मंदिराकड़ं तोंड करून left ला 200 पावलं चाललात की आलीच Canada Bank." हे 200 पावलांचे गणित एइकुन मला खुप मजा वाटलेली. खरच लोकं पावलं मोजतात का चालताना ? पण ते खरा होतं details होते त्यांच्या कड़े सगळे. IIT cut-offs ची ,colleges ची , courses ची, books, classes ची details त्यांना माहित होते. असो !!!

नंतर तो IIT मद्रास हून शिकला. नंतर माझा पण contact गेला त्याच्याशी. मी IIT त fail होउन typical track पकडला होता so त्याने नाद सोडला असेल माझा. पण त्याचे पापा नेहमी चौकशी करायचे माझी वडीलांकडं. नंतर शिकून US ला गेला एका चांगल्या companit कामाला होता. त्याच्या rather त्यांच्या hardwork ला यश आलं होतं. इतके दिवस पाहिलेले स्वप्न
खरं झालं होतं. तो successful होता आता....

अणि काल संकेतने सांगितले- तो US मधेच एका road-side accident मधे गेला...
shit....डोकं सुन्न झालं होतं एकदम. मी त्याला परत विचारलं अमोल मुपिड ?? do u know him ? परत crosscheck केलं की तोच तो का ? तोच तो नको होता मला.....
पण तो तोच होता.... अणि मला मग हे सगळं आठवलं...1-1 details...

मुंगी चिरडली जावी असं वाटलं...अरे इतके efforts, इतकं hard-work, इतके dreams, इतकी sacrifices, अणि त्यांचा end असा ?? shit कसलं क्रूर आहे हे सगळं !! death इतकी स्वस्त झालिये ?? अणि त्याचीच का व्ह्यावी ? बाकि कोणी पण न -effort केलेला मरायला हवा होता. काय value आहे इतकं जगलेल्याला ? सगळे thoughts,हट्ट, अभिमान, स्वप्न या काहीच matter करत नाहीत मरायचं ठरवताना ?? shit 'पत्त्याचा बंगला' वाटतय मला हे सगळं. मनोरे रचायचे- carefully, concentration ने, 1-1 मजला चढवायचा अणि नंतर खाउन-खाउन फुगलेल्या देवाने हळूच पादावं अणि सगळं फुस्स. सगळा बंगला कोसळावा ..
खुप वाईट आहे राव हे, अगदी क्रूर आहे सगळं !

दुसर्या दिवशी अंघोळ करताना पण हेच डोक्यात होतं. अंघोळ समप्ली अणि उरलेलं पानी सवयीने सगळीकडं शिंपडले अणि "गुरुर ब्रम्हा...." पुटपुटु लागलो अनाहुतपणे.मग अचानक लक्षात आलं अरे हे काय केला मी ? कधीच सोडून दिलं होतं ना हे सगळं ??देव-देव, मंत्र-तंत्र etc.
देवाला आपण "भक्ति" पेक्षा "भीतीने" जास्ती मानतो. त्याच भीतीमुळे मी sub-consciously देवाला नमस्कार करायला लागलो होतो. बरं झालं एइन वेळी आवरलं स्वतहाला, मंत्र बंद केले
"अमोल, लढला आहेस तू खुप. आता या देवाने घाण प्रकारे "Cheat-Code" वापरून मारले आहे तुला. तू भारी आहेस देवापेक्षाही "

अगदी मुंगी चिरडल्या सारखं वाटतयं.

........एका अमोलचा दुसर्या अमोलवर लिहिलेला मृत्युलेख....

Wednesday, May 6, 2009

पेप्सीकोला !

लहानच होतो तेव्हा पण..... पारले-जी चा 4 रुपयाचा पुडा घेतला की 1 रुपये change मिळायची, त्या extra पैशातून मग चुन्गम किंवा पेप्सीकोला घ्यायचो... ५० पैशाची साधी पेप्सी or रुपयाची दूध-पेप्सी... आवड होती ती !
then थोड़े मोठे झालो. चार- साडेचार रुपयाची cigarette घेतली की जे 50 पैशे change मिळायचे त्या extra पैशातून halls किंवा कश्मीरी सौंफ घ्यायचो... तोंडाचा वास जावा म्हणुन , गरज होती ती !
अणि आता ? १८ रुपयाचे अमूल बटर घेतले की change मधे २ रु. येतात त्या extra पैशात आजकाल मी TIDE/SURF चं छोटं पाकिट घेतो. हे काय आहे आता ? :D
Time has changed a lot and so is the way we utilize "some exxtra".... it may be that 2 rs. change or the half an hour we get extra on weekends. The way we spend this "extra" has changed. but don't you think its okey to have pepsicola with the change u've got at this age too ??
आजही दूध-पेप्सी मधे माझा आवडता कैरी flavour येत नाही त्यासाठी साधी पेप्सिच घ्यावी लागते :D
similarly its okey to spend half an hour solving "Find Five Differences" puzzle from बालमित्र :D
Spend this way sometime even if it's not "worth it".....
नाहीतरी हा subject "worth" आहे का post करण्या सारखा ?? तरी पण टाकला, थोड़ा वेळ exxtra मिळाला होता म्हणुन... कैरीच्या पेप्सीची चव आली पण तोंडाला .......
( purely Ear Bud )